डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्ता रोको आंदोलन

    34

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

    गंगाखेड(दि.१८ऑगस्ट):- रोजी गंगाखेड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.गंगाखेड येथील गंगाखेड नगरपरिषद मध्ये गटारी साजरी केली त्याबद्दल जे कोणी दोषी असतील त्यांना तात्काळ निलंबित करावे या मागणी करिता सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. परंतु गंगाखेड नगर परिषद प्रशासनाने एका दिव्यांग अपंग असणाऱ्या येका सुरक्षारक्षक नोटीस पाठवून त्याच्यावर त्या नोटीस चे 24 तासात खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले होते परंतु हा संपूर्ण प्रकार CCTV मध्ये फुटेज असून गंगाखेड नगर प्रशासन मात्र याच्याकडे डोळेजाक करताना दिसत आहे अशी चर्चा गंगाखेड शहरात होताना दिसते.

    CCTV मध्ये दिसणाऱ्या वर तात्काळ कारवाई झाली पाहिजे असी मागणी करण्यात आली आहे.गंगाखेड नगर परिषद येथील स्व.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या सभागृहात लोकहिताचे निर्णय घेतले जातात त्या ठिकाणी अशी गटारी पार्टी ज्यानि केली यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे.येणाऱ्या ०७ दिवसात जर कारवाई झाली नाही तर गंगाखेड शहर बेमुदत बंद राहील असे आंदोलन करु असे लेखी निवेदन द्वारे उपविभागीय अधिकारी गंगाखेड तसेच तहसील कर्यालय गंगाखेड यांना कळवण्यात आले आहे.

    यावेळी उपस्थित रामप्रभु मुंढे माजी नगराध्यक्ष गंगाखेड, राजकुमार सांवत नगरसेवक, रणधीर राजे भालेराव रि.पा.ई.नेते, गोविंदराव यादव काँग्रेस ता.अध्यक्ष गंगाखेड, बालाजी मुंडे मनसे नेते, विष्णू मुरकुटे शिवसेना नेते, अनिल सातपुते शिवसेना नेते, राम लटके शिवसेना नेते, ज्ञानोबा व्हावळे, सर्जेराव सोन्नर, धोंडीराम जाधव, बालासाहेब पारवे, प्रशांत फड, चिंतामणी साळवे, बाळु बेंद्रे, श्रीकांत कदम, सिद्धांत कांबळे, हनुमान साबळे,अतुल साबळे, कैलास जगतकर सर्व सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते.!