जन आशीर्वाद यात्रे निमीत्ताने केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ.भागवत कराड यांचं आ.बोर्डीकर यांच्या हस्ते जोरदार स्वागत

26

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

जिंतूर(दि.19ऑगस्ट):-हिंगोली-परभणी जिल्ह्याच्या सीमेवर मंत्री महोदयांचे स्वागत मतदार संघातील नागरिकांसमवेत आडगाव (फाटा) येथे करण्यात आले. मानधानी येथे सुद्धा सत्कार करण्यात आला. प्रसंगी मराठा आरक्षणावर काही तोडगा काढायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवाल, अशी मागणी तेथील युवकांनी केली.जिंतूर येथील जन आशीर्वाद सभेत बोलतांना मंत्री महोदय म्हणाले की, मतदारसंघातील आमदार मेघना बोर्डीकर यांच्या मार्फत बँकिंग, मुद्रा लोन, मराठवाडा अनुशेष संदर्भात आपले प्रश्न नक्की सोडवेल,अशी ग्वाही दिली.
सभेत बोलतांना त्यांनी केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध योजनांचा मागोवा घेतला. लोक समाधानी आहेत, असे ते म्हणाले. परभणी शहराकडे जाता-जाता बोरी येथे सुद्धा त्यांनी सत्कार स्वीकारला.

यावेळी मा.आ.रामप्रसादजी बोर्डीकर, आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार मोहन फड, जिल्हा अध्यक्ष सुभाष कदम,गणेश हाके, माजी आ. रामराव वडकुते, माजी आ. गोविंदअण्णा केंद्रे, यात्रा प्रमुख मनोज पांगारकर, प्रवीण घुगे, बापू घडामोडे, डॉ. गुलाब सांगळे,व्यंकटराव तांदळे, विठ्ठलराव रबदडे,रजनी पाटील, डॉ.विद्या चौधरी, बार्शीकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. बोर्डीकर यांनी केले. तर सुत्रसंचलन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. पंडित दराडे यांनी केले तर. कार्यक्रम यशस्वीते साठी दत्ता कटारे, सुमेध सूर्यवंशी,हकीम भाई, रमेश मोहिते, युवराज घनसावंत, माधव दराडे, अमोल देशमुख,प्रवीण प्रधान, संतोष राठोड, सुनील घुगे, संदीप घुगे,निर्मला बांडे, संगीता जाधव, आदी भाजपा पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख , हजारो च्या संख्येने लोक उपस्थित होते.