सातारा जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने विजया कदम हिचा गौरव

19

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.19ऑगस्ट):-माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2021 घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये वडी हायस्कुल वडी या शाळेची विध्यार्थीनी कु.विजया सुनील कदम हिने गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळविल्या बद्दल सातारा जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

विजया ही भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा सचिव सुनील कदम याची कन्या आहे.तिने मिळविलेल्या यशाबद्दल भारतीय बौध्द महासभा शाखा सातारा जिल्हा व इतर सर्व सामाजिक,शैक्षणिक,आणि राजकीय क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.