मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही- अनिलभाई गांगुर्डे

    38

    ?महिला तलाठीकडे शरीर सुखाची मागणी केल्याने मजली खळबळ

    ✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

    नाशिक(दि.19ऑगस्ट):- नाशिक जिल्ह्यासह येवला तालुक्यात प्रांताधिकारीं यांनी नुकतीच मागासवर्गीय महसूल तलाठी शरीर सुखाची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवार रोजी सायगाव ता.येवला येथील तलाठी श्रीमती मनिषा पुरुषोत्तम इगवे यांचा येवल्याचे प्रांताधिकारी श्री. सोपान कासार यांनी आपल्या घरी बोलवून विनयभंग करून शरीर सुखाची मागणी करत जातीय वाचक बोलून अपमानीत केले व हेतुपुरस्कर बदली केल्यामुळे श्रीमती इगवे यांनी नाशिकला येऊन आंबेडकरी चळवळीतील नेत्यांची भेट घेऊन आपला तक्रार अर्ज देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केलीआहे

    याप्रसंगी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आण्णासाहेब कटारे, रिपाई आठवले पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख अनिलभाई गांगुर्डे,वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश नेते .बाळासाहेब शिंदे,आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते मदन आण्णा शिंदे, एकता वादी रिपब्लिकन पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष आदेशभाऊ पगारे,माजी नगराध्यक्ष .विलासजी पवार, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष बाळासाहेब साळवे, येवला रिपब्लिकन सेनेचें शिवाजी गायकवाड ,पञकार शातांरामभाऊ दुनबळे सह आंबेडकरी चळवळीतील युवा नेते विक्रांत गांगुर्डे,समाधान औसरमल,युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते..