बलात्काऱ्यांसाठी शरीयत सारखा कायदा लागू करा- प्रा. ताज मुलानी

29

🔹दलित मुस्लीम विकास मंच तर्फे राष्ट्रपतींना निवेदन सादर

✒️नवनाथ पौळ(विशेष प्रतिनिधी)

बीड(दि.19ऑगस्ट):–महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात दिवसेंदिवस वाढणारा व भारतीय संस्कृतीला काळिमा फासणारा अल्पवयीन मुलींना बलात्कार करून ठार मारणाऱ्या त्या नराधमांना शरीयत सारखा कायदा ज्यामध्ये भर चौकात फाशी देणे किंवा शिरच्छेद करणे किंवा जिवंत पुरण्यासारख्या कठोर कायदा , राष्ट्रपतींनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर करून देशात हा लागू करावा या मागणीचे निवेदन मा. राष्ट्रपतींना मा.जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत दलित मुस्लीम विकास मंच द्वारे प्रा. ताज मुलानी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी शिष्टमंडळात मार्गदर्शक शेख इसाक शेठ, महिला आघाडीच्या रहिमाबाजी, संघटनेच्या कायदे सल्लागार ॲड.गिता करमाळकर, जिल्हाध्यक्षा जिजाबाई साळवे, संघटनेचे युवा नेते सय्यद ईनामआदी उपस्थित होते.

भारतीय संस्कृतीत स्त्रियांना मानाचे स्थान असून त्यांचा सन्मान केला जातो भारतीय संस्कृतीत कोणत्याही ठिकाणी स्त्रियांची अवहेलना केली गेली नाही त्यामुळे जगात भारतीय संस्कृतीची छाप आहे परंतु सध्या काही माथेफिरू नराधमांकडून या संस्कृतीचा नाश होत असल्याचे दिसत आहे संपूर्ण भारत देशात रोज दिवसेंदिवस शहरी भाग असो की ग्रामीण भाग असो माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अल्पवयीन किंवा किशोरवयीन मुलींवर जबरदस्तीने बलात्कार करून जिवे मारण्याच्या घटना गेल्या पाच दहा वर्षापासून वाढत चाललेले आहे त्यात चढताक्रमच दिसत आहे त्याचे कारण आहे की, असे हे नराधाम कायद्यातून पळवाटा काढून निर्दोष सुटका करून घेत आहेत.

त्याकरिता या नराधमांविरोधात जर का शरीयत सारखा कायदा झाला व त्यांना भर चौकात फासावर लटकावले किंवा त्यांचा शिरच्छेद केला गेला किंवा जिवंत पुरले गेले तर त्याचा भयंकर प्रभाव पडेल व या घटनांवर अंकुश लागून या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याकरिता मा.राष्ट्रपती महोदयांनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर करून बलात्कारासाठी शरीयत सारखा कायदा लागू करावा अशी मागणी दलित मुस्लिम विकास मंच तर्फे राष्ट्रपती यांना मा. जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत एका निवेदनाद्वारे केली आहे .जर का हा कायदा त्वरित लागू केला गेला नाही तर महाराष्ट्रातून जनजागृती करून संपूर्ण भारतभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष प्रा. ताज मुलानी सर ,महिला आघाडीच्या रहिमाबाजी, मार्गदर्शक शेख इसाक शेठ, कायदे सल्लागार ॲड.गिता करमाळकर, संघटनेच्या जिल्हाध्यक्षा जिजाबाई साळवे आणि संघटनेचे युवा नेते सय्यद ईनाम आदींनी दिला आहे.