राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMS) परीक्षेत, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गावंदराचे घवघवीत यश..

    51

    ✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

    बीड(दि.20ऑगस्ट):-ऊसतोड मजुरांचा जिल्हा ओळखत असलेल्या बीड जिल्ह्यातील एक नावाजलेली आय. एस. ओ मानांकित शाळा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गावंदरा, तालुका धारूर जिल्हा बीड….!!!50 टक्क्यांहून ही अधिक पालक वर्ग ऊसतोड मजूर असूनही इथल्या कणाकणांत गुणवत्तेचे दर्शन होते. त्यातही मुलींची संख्या अधिक ही बाब कौतुकास्पद आहे.नृत्य,भाषण कला, विज्ञान,गायन व गुणवत्ता तसेच बौद्धिक शारीरिक सर्वच क्षेत्रात या शाळेतील विद्यार्थिनीचे गुणवत्ता प्राविण्य झळकत असते.

    “ही आवडते मज
    मनापासुनी शाळा,
    लाविते लळा
    जसा माऊली बाळा”…

    दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावंदरा, येथील चार विद्यार्थिनींनी,”राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांतील” विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे.राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा NMMS दि.०६/०४/२०२१ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी ११६८२ इतका शिष्यवृत्ती कोटा MHRD नवी दिल्ली यांच्या कडून निश्चित केला होता. शिष्यवृत्ती धारक गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावी दरवर्षी बारा हजार या प्रमाणे एकूण ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते.

    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावंदरा ,शाळेतील कु.बडे समीक्षा श्रीराम हीस ७९ गुण,कु. कांबळे अंजली रामेश्वर हीस ६४गुण,कु. बडे तेजस्विनी ज्ञानोबा हीस ७८ गुण तर कु. घुले गायत्री गणेश हीस ८४ गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.यापैकी एक कु.घुले गायत्री गणेश ही विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीधारक झाली आहे.

    सदरील विद्यार्थिनीला इयत्ता ९वी ते १२वी दरवर्षी १२०००/रुपये प्रमाणे एकूणळ ४८०००/रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.या शिष्यवृत्ती धारक आणि पात्र विद्यार्थिनींचे शिक्षक, पालकवर्ग व समस्त गावकऱ्यांच्या वतीने कौतुक केले जात आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री.घोळवे , मार्गदर्शक शिक्षक श्री. सचिन क्षीरसागर ,श्री. विजयकुमार सिताप,श्री. बाबासाहेब चौधरी ,श्री.रामेश्वर मुंडे ,श्री.विशाल कदम ,श्रीम.निर्मला हळगावकर ,श्रीम. जया मुंडे ,श्रीम.अनुराधा मोतेवार , श्रीम.जयश्री गुट्टे ,श्रीम.मीरा फरताडे या सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले आहे…!!