तीनशे मीटर खोल दरीतून काढला मृतदेह – पोलीस आणि महिंद्रा पथकाची कामगिरी

22

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.20ऑगस्ट):- इगतपुरी तालुक्यातील मान वेढे येथील आदिनाथ हनुमंता विर हा व्यक्ती 23 जुलैपासून सापडत नव्हता ह्या व्यक्तीचा मृतदेह मानवेढे गावापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका खोल दरीत माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलिस पथकासह महिंद्रा कंपनीच्या गमतीने मृतदेह बाहेर काढला अतिशय खडतर आणि जीवघेण्या मोहिमेतून हा मृतदेह बाहेर काढण्याचे कौतुक होत आहे अधिक माहिती अशी की इगतपुरी तालुक्यातील मानवेढे येथील आदिनाथ हनुमंता विर 23 जुलैपासून बेपत्ता होते.

त्यांचा मृतदेह अत्यंत खोल दरीत असल्याबाबत ग्रामस्थांनी इगतपुरी पोलिसांना माहिती दिली सततचा पाऊस आणि अतिदुर्गम खोल दरी असल्याने मूर्त देह काढणे अशक्य होते इगतपुरी चे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी महिंद्रा कंपनीचे फायर ऑफिसर हरीश चोबे यांना याबाबत माहिती दिली त्यानंतर महिंद्रा पथकाने कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कैलास ढोकणे सिक्युरिटी मॅनेजर जयंत इंगळे यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी धाव घेतली पोलीस निरीक्षक समाधान नागरे महिंद्रा कंपनीचे फायर ऑफिसर हरीश चौबे अनिल नाठे फायरमन अजय मसने मनोज भडांगे गावातील पोलीस पाटील हरिचंद्र भागडे आदी सर्व ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले सर्वांच्या अथक प्रयत्नाने तीनशे मीटर खोल दरी असलेल्या दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी फायर ऑफिसर हरी चोबे आणि त्यांच्या टीमचे आभार मानले