तेजपृथ्वी ग्रुप महाराष्ट्र च्या वतीने इंदापुर तालुका आणि सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांची निवड

29

🔸इंदापूर तालुकाध्यक्षपदी राहुल नाकाडे यांची तर सोलापूर शहराध्यक्षपदी सुनील जोगदंडकर यांची वर्णी

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.6सप्टेंबर):-तेजपृथ्वी ग्रुप महाराष्ट्र राज्य च्या वतीने इंदापूर शासकीय विश्रामगृहात इंदापूर पंचायत समिती सभापती महेंद्र दादा रेडके ॲड. राहुलजी मखरे भगवानजी कोळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तेजपृथ्वी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यामध्ये इंदापूर तालुका अध्यक्षपदी संसर निंबोडी येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल नाकाडे यांची वर्णी लागली असुन इंदापूर तालुका महिला अध्यक्षपदी सौ. अर्चना मधुकर गोरड यांची तर इंदापूर तालुका कार्याध्यक्ष पदी तानाजी हेगडकर यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच तेजपृथ्वी ग्रुपचे सोलापूर जिल्ह्यातील आपले सामाजिक कार्य वाढविण्यासाठी सोलापुर शहर अध्यक्षपदी विश्व 24 न्यूजचे संपादक श्री सुनील जोगदंडकर यांची निवड करण्यात आली आहे याप्रसंगी सभापती महेंद्र दादा रेडके, ॲड.राहुलजी मखरे, भगवानजी कोळेकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले सामाजिक चळवळ असलेल्या तेजपृथ्वी ग्रुपची ध्येयधोरणे, उद्दीष्टे, सामाजिक बांधिलकी जोपासत सुरू असलेले कार्य, सामाजिक जाणीवेतून राबवत असलेल्या व राबवायच्या विविधांगी उपक्रमाबद्दल तेजपृथ्वी ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक श्री नानासाहेब खरात यांनी आपले मनोगत व्यक्त करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी आपली तेजपृथ्वी ग्रुपच्या पदाधिकारीपदी निवड केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सर्व पदाधिकाऱ्यांनी यापुढे तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून गोरगरीब लोकांचे हित डोळ्यासमोर ठेवून समाजातील तळागाळातील लोकांना मदत करण्यासाठी आपण सदैव कटिबध्द असल्याचे आश्वासन दिले.सदर कार्यक्रमप्रसंगी तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सौ. अनिताताई खरात, उपाध्यक्ष गणेश भाऊ शिंगाडे, कार्याध्यक्ष संपत पुणेकर सामाजिक कार्यकर्ते वशिम शेख डोनाल्ड शिंदे, संदीप रेडके, रुपेश वाघमोडे, अमोल कोकरे सुधीर पाडुले व इतर तेजपृथ्वी ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.