आ. रमेश लटके, SRA प्रकल्पात ढवळाढवळ करून स्वतःचे व हित चिंतकांचे अनेक्सचर पात्र करून घेऊ नका.:- डॉ. राजन माकणीकर

24

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.11सप्टेंबर):-आमदार साहेब मतदार संघातील विकासकामा कडे लक्ष द्या, एसआरये मध्ये हस्तक्षेप करून स्वतः आणि हितचिंतकांचे परिशिष्ट-2 पात्र करून घेऊ नका अन्यथा प्रसंगी कायम घरीच बसावे लागेल. असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी प्रतिनिधी शी बोलतांना दिला.*

विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर पुढे म्हणाले की,
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत आमदार रमेश लटके हे स्वार्थ साधन्याहेतु हस्तक्षेप करत असून मूळझोपडी वासीयांचा प्रश्न सोडून जेथून माया मिळेल अश्या लोकांना विकासक व अधिकाऱ्यांना आमदारकीचा बळ प्रयोग करून प्रकल्पाशी संबंध नसलेल्यांना सदनिका पात्र करून देण्यात अग्रेसर दिसत आहेत.

रिब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक अश्या कटकारस्थानाला शह देऊन मूळ झोपडी धारकांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी कटिबद्ध आहे. असे कोणी फसले असतील सदनिके पासून वंचित असतील अश्यांना आम्ही मूलभूत हक्का पासून संरक्षित करू असा मनोदय डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केला.

आमदार लटके हे गरिबांच्या मूलभूत गरजा कडे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी ज्यांनी सदनिकेचा ताबा मिळवून आपला संसार थाटत आहेत अश्यांना बाहेर काढून स्वतः ची पोळी भाजण्यात धन्यता मानत आहेत या त्यांच्या चुकीच्या व गरिबांना बेघर करण्याच्या धोरणाचा आम्ही तीव्र निषेध नोंदवत असल्याचे डॉ. माकणीकर यांनी यावेळी जाहीर केले.

कोण येतंय, कोण जातंय, आपल्या फायद्याचा व्यक्ती आहे का? अस सतत सी.सी TV कडे बघत एअर कंडिशन मध्ये बसून हुकूमशाही गाजवणाऱ्या गोर गरिबांच्या मतदानावर निवडून येऊन त्यांचाच निवारा हिसकावून घेणाऱ्या आमदार लटके यांच्या विरोधात विधानसभा व विधान परिषद अध्यक्षा कडे तक्रार करण्यात येणार असल्याचेही डॉ राजन माकणीकर व कॅप्टन श्रावण गायकवाड यांनी सांगितले.

विकासकामांच्या दृष्टीने काही प्रभागात पेअर ब्लॉक चे काम आमदार फंडातून केले होते मात्र एकही पावसाळा ते टिकले नाही, परिसरातील विकासकांच्या तक्रारी करणे याच्या पेक्षा त्यांनी कोणतेच कामे केल्याचे दिसून येत नाही शिवाय ज्या विकासकांच्या तक्रारी केल्या त्याचे पुढे काय झाले? हा प्रश्न कायम गुलदस्त्यातच असतो. असाही टोला डॉ. माकणीकर व कॅप्टन गायकवाड यांनी लगावला आहे.

आ. लटके यांच्या कारकीर्द मध्ये किती निधी आला व कोठे वापरला त्यांचे वेतन किती व मालमत्ता जंगम स्थावर संपत्ती किती? कशी मिळवली याचा उलगडा लवकरच माय बाप जनतेसमोर आम्ही आणत असून आगामी काही दिवसात आमदारांनी मतदारसंघातील मूळ प्रश्नाकडे लक्ष नाही दिले तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही RTI ऍक्टिव्हिस्ट डॉ. राजन माकणीकर यांनी दिला.