शेती मालाला भाव द्यावाच लागेल अन्यथा……..

36

वर्षानो वर्षी का छळ करतायेत आम्हा शेतकऱ्यांचा, आमची आर्थिक व्यवस्था बळकट झाली तर आमची मुलं तुमची कार्यकर्ता बनून गुलाम होणार नाहीत यासाठी तर नाहीना?
की व्यापारी वर्ग पोसवून शेतकरी वर्षानी वर्षी दरिद्रीच्या दरीत सडावा यासाठी का??? आज मला उत्तर हवंय कुठवर घाव सहन होणार, एक दिवस मृत्यू येईल पण तुम्ही सुधारणार नाहीत, काय गरज होती शेती माल आयात करायची,आपल्या देशात काय कमी शेती माल आहे का?? का मध्यम वर्ग व श्रीमंत वर्ग माझ्या सारखा भिकारी बनणार होता का??
की माझ्यासारख शेत मालाला भाव नाही म्हणून आत्महत्या चा विचार करणार होता का?? कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आयुष्यात किती दुःख आहे हे तुम्ही अनुभवलं आहे का,कोरड्या आणि ओल्या दुष्काळाच्या झळा तुम्ही शोसल्या आहात का ? माझा शेतकरी माझा बळीराजा हे आदराचे शब्द तुम्ही वर वर बोलता का,काय केलंत आम्ही तुमचं वाटोळं आमच्या मागे का काळासारखे लागलात,चार दिवस आहेत जगू द्या ना सुखाने,नंतर निसर्ग आमच्यावर कोपतोच की, अधून मधून आमची बळी घ्यायला.कोना कोणाला पोसवायचं हो आम्ही,अजून कोन कोण आमचे रघत पियुन गिधाडा सारखे फडस्या पाढणार आहे सांगा ना मला,कोणतं पाप केलं मी याची शिक्षा देतायेत , अन्न पिकवनं जगाला पोसवन हा गुन्हा आहे,सांगा ना आज मला उत्तर हवंय.

माझा शेत माल जेव्हा बाजारात येतो तेव्हाच भाव घसरतात का?? जेव्हा माझा शेत माल विकल्या जातो. नंतर इतरांसाठी वाढतात का??तुम्ही आम्हाला पोसवतायेत की धनधागड्या व्यापाऱ्यांना?? या उत्तराला प्रश्न नाहीये. प्रत्येक वर्षी हेच आहे जेव्हा शेतकरी माल विकतात तेव्हा कमी व्यापारी विकतात तेव्हा जास्त,तुम्ही कोण आमच्या शेतमालाची किम्मत ठरवनारे देवाघरून उतरलात की देव समजतायेत स्वतःला , त्यामुळे शेत मालाचे सर्व अधिकार आम्हाला नाहीत,की तुमच्या सारख्याना पदावर नियुक्त करून आम्ही चूक केली, की तुम्ही माझ्या विश्वासाचा बलात्कार केला,सांगा साहेब आज उत्तर हवंय मला,माझ्या शेत मालाला का न्याय देत नाहीयेत, का अन्याय करतायेत माझ्यावर, माझी मुलं तुमची गुलाब व्हावीत म्हणून तर नाहीना, माझ्या मुलाने वही पेन न घेता तुमच्या हजार पाचशे वर तुमचा झेंडा हातात घेऊन फिरावेत , म्हणून तर अशी परिस्थिती निर्माण करत तर नाहीयेत ना?. की शिक्षण न घेता तुमच्या दंगली मोर्चे आंदोलनात सहभागी होऊन आयुष्याची राख रांगोळी करून घ्यावी यासाठीतर नाही ना??
काय अडचण आहे साहेब, का करतायेत असं होऊ द्या आम्हाला ही बळकट अन मजबूत,कुठपर्यंत बँक व सावकराचा दरवाजा ओलांडाचा कर्जासाठी, अहो मृत्यू येतो पण उपचार व हॉस्पिटल साठी पैसे नसतात. निसर्ग आमाला छळतोच आहे ना, तुम्ही तर नका साहेब,साहेब माझ्या शेतीमाला ला भाव द्या, विमा लवकरच मजूर करा, आपत्तीग्रस्त भागातील शेतकरी वर्गाला तात्काळ अनुदान द्या मदत द्या साहेब,मला विश्वास आहे तुम्ही नक्कीच आम्हा शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण करताल आता एवढीच आशा आणि अपेक्षा उरलीये, नाहीतर सरळ सांगा होत नाहीये म्हणून तरफडून अन होरपाळून मरन्यापेक्षा पारंमपारिक रीतीने गळफास……

✒️लेखक:-अंगद दराडे(बीड)मो:-8668682620