महाराष्ट्र बंद आंदोलन : सिल्लोड मध्ये कडकडीत बंद

33

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

सिल्लाेड(दि.12ऑक्टोबर):-उत्तर प्रदेश येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने चारचाकी वाहनाने शेतकऱ्यांवर केलेल्या हल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड – सोयगाव तालुक्यात महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास सर्व स्तरातून उदंड प्रतिसाद मिळाला.जवळपास 100 टक्के व्यापाऱ्यांनी या आंदोलनाच्या समर्थनार्थ बंद पाळून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पाठिंबा दर्शविला.

यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, शहर प्रमुख रघुनाथ घरमोडे, युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, शेख इम्रान ( गुड्डू ), नगरसेवक विठ्ठल सपकाळ, रुउफ बागवान, शंकरराव खांडवे, शकुंतलाबाई बन्सोड,आसिफ बागवान, सुधाकर पाटील, मतीन देशमुख, जितू आरके, सत्तार हुसेन, प्रशांत क्षीरसागर, रईस मुजावर, राजू गौर, जुम्मा खा पठाण, मनोज झंवर, चांद बेग मिर्झा,शेख सलीम हुसेन, सुनील दुधे, मोईन पठाण, रतनकुमार डोभाळ, शेख बाबर, शेख मोहसीन यांच्यासह शिवसेना व्यापारी आघाडीचे अमृतलाल पटेल, अनवी सरपंच डॉ. दत्ता भवर, संजय मुरकुटे, संतोष धाडगे, रवी रासणे, गौरव सहारे, रवी गायकवाड, जगनाथ कुदळ, फहिम पठाण, कुणाल सहारे, पालोद सरपंच नासेर पठाण, उपसरपंच मॅचिंद्र पालोदकर, रमेश पालोदकर, अशोक पालोदकर, अमोल कुदळ, कैलास इंगे, मुश्ताक देशमुख, हेमल नगरिया, एकनाथ शिंदे, पांडुरंग डवणे कृष्णा वाघ, रवींद्र दाणी, लक्ष्मण कल्याणकर, एकनाथ पंडित आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी व शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.