– युवती आहे दुसर्‍यांदा गर्भवती

नुकतीच दिली 10 वर्षापासुन विवाहित असल्याची कबुली – पोलिसांत तक्रार दाखल

चंद्रपूर-
पोलीस वसाहतीत राहणार्‍या प्रमोद दुबे नामक व्यक्तीने एका युवतीला लग्नाचे आमिष देऊन वारंवार लैंगिक शोषण केले असल्याचा आरोप पीडित युवतीने रामनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला असुन सदर युवक हा विवाहित असुन त्याने ही माहिती लपवून आपल्याशी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.

सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर येथिल पोलीस वसाहतीत राहणार्‍या प्रमोद दुबे नामक व्यक्तीने पीडित युवती सोबत मैत्री केली,

नंतर तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढुन वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. युवतीने लग्नाची मागणी करताच तिला भूलथापा देऊन टाळाटाळ करून पुन्हा पुन्हा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास बाध्य केल्या जात असल्याचे युवतीने सांगितले आहे.

सदर युवक ठिकठिकाणी ह्या युवतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता ह्या कामी त्याला त्याच्या मित्रांची साथ होती. कित्येकदा त्याने आपल्या मित्रांच्या खोलीवर नेऊन आपल्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले असल्याचे तरुणीचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे हा युवक थेट मुलीच्या घरी कुणीही नसताना तिच्याच घरी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

काही महिन्यांपूर्वी ह्या संबंधातून ती तरुणी गर्भवती झाली होती परंतु त्यावेळी ह्या युवकाने तिची तब्येत बरी नसल्याने इतर औषधा सोबत गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात करविला होता.

त्यानंतरही लग्नाचे आमिष देऊन ह्या युवकाने तिच्याशी पूर्ववत शारीरिक संबंध कायम केले. काही दिवसा पुर्वी सदर युवतीने लग्नाचा हट्ट धरला असता त्याने तिच्या घरीच फुलाचे दोन हार आणुन ते एकमेकांच्या गळ्यात घालुन लग्नाचा बनाव केला व लॉक डाऊन संपल्यावर नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचे आश्वासन दिले.

त्यानंतर त्याने त्या युवतीला शहरात आणले व एका हॉटेलच्या खोलीत चार दिवस ठेवले. ह्या दरम्यान तिच्याशी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले, त्यामुळे आपण सध्या पुन्हा एकदा गर्भवती असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. हॉटेल मधे मुक्कामाला असताना तिने त्याच्या घरी घेऊन चलण्याचा आग्रह केला असता शेवटी आरोपीने आपण 10 वर्षापासुन विवाहित असल्याचे युवतीला सांगुन ह्या कारणाने तुला घरी नेणे शक्य नसल्याचे सांगितले.

ह्या घटनाक्रमाचे हादरलेल्या युवतीने जेसीआय राजुरा व फ्रेंड्स महिला चॅरिटी ग्रुपच्या अध्यक्ष सरिता मालु व मनसे महिला जिल्हाप्रमुख सुनीता गायकवाड ह्यांच्याशी संपर्क साधून आपबीती कथन केली असता सरिता मालु, सुनीता गायकवाड, रंजना नाकतोडे, अर्चना आमटे, वर्षा बोंबले ह्यांच्यासह रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली असुन पोलिसांनी दिनांक 15 जून 2020 रोजी रात्री भादंवी च्या कलम 376 (2)(11), 417, 323, 504, 506 इत्यादी कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली असुन पोलीस तपास सुरू केला आहे.

Breaking News, चंद्रपूर

©️ALL RIGHT RESERVED