बस स्थानकातील खासगी वाहनाच्या शिस्तीसाठी दोन आरटीओंची नियुक्ती

27

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.29नोव्हेंबर):-गेल्या २४ दिवसांपासून एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर असल्याने प्रवाशांची गैरसोय होवू नये, यासाठी खासगी वाहनाला वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली.

बीड बसस्थानकात अनेक वाहने प्रवाशी घेवून जातात. या वाहनांचे नियोजन लावण्यासाठी दोन आरटीओंची नियुक्ती करण्यात आली. कर्मचारी शिस्तीने वाहने भरून देत आहेत. प्रत्येक गाडीचे नंबर लिहून घेत प्रवाशांची गैरसोय होवू नये याची काळजी घेत आहेत.

एस.टी. महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी २४ दिवसापासून एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर असल्याने याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. वाहतुकीसाठी खासगी वाहनांना परवानगी देण्यात आली.

बीड बसस्थानकामध्ये अनेक वाहने प्रवाशी घेवून जातात. या वाहन धारकात वादावादी होवू नये, नियमाने त्यांनी प्रवाशी घेवून जावे त्यासाठी आरटीओ विभागाच्यावतीने दोन कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये पुजा ब्रह्मानंद खडकीकर व संकेत कदम यांचा समावेश आहे.

हे दोन्ही कर्मचारी प्रत्येक वाहन धारकांकडे प्रत्येक वाहनांचे नंबर घेवून त्यांना ज्या-त्या रूटने पाठवत आहेत. एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरुच असून काल बीड डेपोमधून दोन गाड्या सोडण्यात आल्या होत्या.

मात्र, आज एकही गाडी सोडण्यात आली नाही. आगारातील चालक गोरख करांडे यांची तब्येत खालावल्याने त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.