महात्मा फुले ग्रामिण पतसंस्था, धरणगांव येथे शिक्षणतज्ञ राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

    42

    ✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

    धरणगांव(दि.29नोव्हेंबर):- येथे महात्मा फुले ग्रामिण पतसंस्थामध्ये २८ नोव्हेंबर रोजी क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

    याप्रसंगी माळी समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक मा.चेअरमन वि.का.सो.मा.कोषाध्यक्ष माळी समाज धरणगांव बापुसो. तुळशीराम जाधव, तसेच पतसंस्थेचे चेअरमन मा.मोतिलाल माळी यांच्या हस्ते क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

    याप्रसंगी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन अनिल महाजन , संचालक आप्पासो. पुनिलाल महाजन, पत्रकार धर्मराज मोरे, दयाराम महाजन, सुरेश राठोड , पुना महाजन, संचालिका अरुणा महाजन, व्यवस्थापक रवि पाटील, दिलीप पाटील, हर्षवर्धन वाघ, यशपाल बयस, गणेश फुलपगार आदी . उपस्थित होते.