युवकांनी एड्स निर्मुलन चळवळीमध्ये सहभागी व्हावे – जिल्हा न्यायाधीश आर. एस मेहेरे

34

🔸जागतिक एड्स दिन कार्यक्रम

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

बुलडाणा(दि.1डिसेंबर):- जागतिक एड्स दिनाच्या दिवशी सर्व युवकांनी प्रण करुन एड्स निर्मूलन चळवळीमध्ये सहभाग घ्यावा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. एच.आय.व्हि.संसर्गापासुन स्वतःचे व इतरांचे संरक्षण करावे, लग्नापुर्वी एच.आय.व्हि.तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश आर.एन. मेहेरे यांनी केले.

जिल्हा रुग्णालय येथे जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. एच.आय.व्हि. एड्स विषयक जनजागृतीपर विशेष मासीक कार्यक्रमांचे आयोजन व एड्स विषयी जनजागृतीपर रॅलीचे आयोजन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर जागतिक एड्स दिनानिमीत्त आयोजित विविध स्पर्धांच्या विजेत्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी एड्स नियंत्रण कार्यक्रमामध्ये उत्कृष्ठ कार्य करणा-या अधिकारी, कर्मचारी स्वयंसेवी संस्था यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती यांनी एड्स निर्मूलनाची शपथ दिली व सेल्फी स्टँडचे फित कापून उद्घाटन केले. मान्यवरांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे साजिद आरिफ सैय्यद, प्रांजली बावस्कर सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता विभाग, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.नितीन तडस यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला डॉ.भुसारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.खिरोडकर, डॉ.चौधरी, डॉ. कदम,डॉ.राजपुत, मेट्रन कुळकर्णी, नर्सिंग स्कुलच्या प्राचार्या श्रीमती खेडकर, डॉ.सरोदे, म.फुले समाज कार्य महाविद्यालय,शरद कला महाविद्यालय, विदर्भ महाविद्यालय, बसंतप्रभा नसँग कॉलेज, वि.एस. पटेल महाविद्यालय,राजीव गांधी महाविद्यालय,शासकीय नसँग स्कुल यांचे प्राध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

त्याचबरोबर नेहरू युवा केंद्राचे अधिकारी व स्वयंसेवक, मातृभुमी फाऊंडेशन, नेटवर्क ऑफ बुलडाणा, कृषीसमृध्दी फाऊंडेशन यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डापकु कार्यालय, ए.आर.टी.सेंटर, आय.सी.टि.सी, एस. टि.डी, रक्तपेढी विभागातील अधिकारी व कर्मचारी, मातृभुमी फाऊंडेशन यांनी प्रयत्न केले. संचालन गजानन देशमुख यांनी तर आभार लक्ष्मीकांत गोंदकर यांनी केले.