म.फुले आणि डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्रियाचे उद्धारक – प्राचार्या शुभांगी ठमके,किनवट

42

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.1डिसेंबर):- भारतीय स्री ही गुलामाचीही गुलाम होती ,तिला बंधमुक्त करण्याचे काम म.जोतीबा फुले आणि डाॕ.बाबासाहेब आंबेडकर या गुरूशिष्याच्या जोडीने केले.म.फुले यांनी विचाराची परेणी केली आणि डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातून त्यास मूर्त रूप दिले आणि आजची स्री मुक्त झाली, म्हणून तिचा पुरूषार्थाच्या सर्वच क्षेत्रात वावर सूरू झाला आहे.म.जोतीबा फुले आणि डाॕ.बाबासाहेब आंबेडकर हेच ख-या अर्थाने भारतीय स्रियांचे उद्धारक आहेत अशा आशयाचे उद्गार,जोतीबा फुले कनिष्ठ महाविद्यालय, घाटीच्या प्राचार्या शुभांगी ठमके यानी चार्वाकवनात संपन्न झालेल्या म.फुले स्मृतीदिन कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून बोलतांना काढले.

म.जोतीबा फुले स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि.२८ नोव्हेंबर २०२१ रोजी ११ वाजता चार्वाकवनात करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बौद्ध संस्कार संघ,यवतमाळचे संघचालक आचार्य विश्वास गोपीचंद बडवाईक हे होते,तर सर्व उपासक, सेनि.पोलीस निरीक्षक आनंदराव भगत, से. नि. जिल्हाधिकारी मनोहरराव भगत, न. प. पुसदचे माजी उपाध्यक्ष ताहेरखान पठाण,जि.प.चे माजी शिक्षण सभापती बी,जी.राठोड, प्रज्ञा पर्वाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव कांबळे ,माजी अध्यापक नारायणराव क्षिरसागर,दलित मित्र एस.टी,भगत,संविधान घर चळवळीत कार्यरत असणारे भीमराव भवरे, प्रा.विलास भवरे, मोहदी येथील संविधान घराच्या संचालिका सुरेखा भगत आणि भागेश्री भवरे , पोखरी येथील संविधान घराचे संचालक प्रमोद गायकवाड आणि कृष्णराव मुनेश्वर,दिग्रसचे मधुकर वाघमारे तसेच बौद्ध संस्कार संघ यवतमाळचे आचार्य जीवन भोवते धम्मपीठावर प्रमुख अथिती म्हणून उपस्थिती होते.

कार्यक्रम सूरू होण्यापूर्वी महाराष्ट्र कलाकार न्याय हक्क संघ यवतमाळचे अध्यक्ष प्रा.जनार्धन गजभीये यांनी प्रसंगोचित सुंदर गीत सादर केले.त्यानंतर धम्मपीठावरील अथितीनी बुद्ध मूर्तीचे पूजन केले तसेच छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा केला.म.जोतीराव फुले ,सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डाॕ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर सर्व पाहुण्याचे, म.फुले समता विचार मंच बहु.शैक्षणिक संस्थेतर्फे स्वागत करण्यात आले.त्यानंतर या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या उपा.आनंदराव भगत यांचे प्रसंगोचित भाषण झाले .कार्यक्रमाचे अध्यक्ष आचार्य विश्वास गोपीचंद बडवाईक यांनी अध्यक्षीय समारोपातून म.फुले पतीपत्नीच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला .

कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि सूत्रसंचलन संस्थेचे संचालक गोवर्धन मोहिते यांनी केले तर, आभार संस्थेचे अॕड.अप्पाराव मैन्द यांनी मानले.यावर्षी मोहदी,पोखरी,लेवा,पेढी,उमरखेड येथून बरीच स्री-पुरूष मंडळी हजर होती, तसेच भीम पँथर अध्यक्ष भाऊ जगताप ,युवा कार्यकर्ते सुरेश कांबळे आणि प्रफुल्ल भालेराव हेही हजर होते. त्यांनी संविधान प्रचार कार्य करून संस्थेला सहकार्य करण्याचे जाहीर केले, त्याबद्दल अॕड.अप्पाराव मैन्द यांनी त्यांचे स्वागत करून आभार मानले.याच कार्यक्रमात प्रज्ञा पर्वाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव कांबळे यांनी वैयक्तिक रित्या उपा.आनंदराव भगत यांचा सत्कार केला.स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.