आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील मुस्लिम समाजाचा युवक गेल्या पाच वर्षापासून वाराणशी (काशी) येथून आणत आहे (कावड) गंगा जल..

  43

  ?सलाम या तूझ्या कार्याला.. यातून दिला सर्वधर्म समभावनेचा संदेश

  ✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

  आष्टी(दि.1डिसेंबर):- तालुक्यातील सांगवी पाटण येथील समीर बादशहा शेख हा गेल्या पाच वर्षांपासून वाराणशी येथे जात आहे.त्याच्या सोंबत गणेश भगत,सागर सुरवसे ,बिबिशन भोसले,अनिकेत गव्हाणे,पवण सातपुते असे मिळुन ७० नागरिक होते.सांगवी पाटण ते वाराणशी १५०० किमी अंतर आहे.भावीक रेल्वे,ट्रॅव्हल्स ने दरवर्षी काशीला जातात व गंगाजल घेऊन येतात.समीर शेख हा युवक आपल्या गावातली युवकांसोबत २३ नोव्हेंबर या तारखेला रेल्वेने वाराणशी ला गेला होता तर २७ नोंव्हेबर ला सांगवी पाटण येथे पोहोचला.२७ व २८ नोंव्हेबर हे दोन दिवस कार्यक्रम होता.सांगवी पाटण येथील जागृत देवस्थान श्री भैरवनाथ मंदिर आहे.सात वर्षापासून गावकरी मंडळी नाथ जन्माआष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करतात.पंच क्रोशीतील ५ ते ६ हजार नाथ भक्त जमतात.प्रथम २७ तारखेला ९ ते ११ या कालावधीमध्ये किर्तन होते.रात्री १२ वाजता काशीवरून आणलेल्या कावडीच्या पाण्यानी देवाला आंघोळ घातली जाते व दुसऱ्या दिवशी किर्तन होऊन महाप्रसाद वाटप केला जातो.

  सांगवी पाटण येथील तब्बल ७० नागरिक यावर्षी वाराणशी ला कावड आणण्यासाठी गेले होते,त्यांच्यामध्ये मुस्लिम समाजाचा युवक सलग पाच वर्षापासून जात आहे.त्याचे म्हणणे आहे की,सगळ्यांचा देव एकच आहे,आपण सर्व भारतीय नागरिक भाऊ आहोत.सामाजिक कार्यात नेहमी तो पुढे असतो आणि गेल्या सात वर्षांपासून शिवनेरी ते सांगवी पाटण शिव ज्योत घेऊन येतो.या मधून खरंच त्याने सर्वधर्म समभावणेचा संदेश दिला.सलाम तूझ्या या कार्याला.

  यावेळी कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शत्रुघ्न बापू मरकड,पोलीस निरीक्षक बाबासाहेब चव्हाण,उद्योजक पांडुरंग सोनवणे साहेब,युवा नेते राजा भाऊ भोसले,सरपंच दत्तात्रय आबा खोटे,उपसरपंच अमोल दादा खिलारे,नवनाथ भगत,डॉ.राजेश झिंजुर्के,ग्रामपंचायत सदस्य उद्धव भोसले,भाऊसाहेब खिलारे,प्रकाश गवारे,सद्दाम शेख,अन्सार शेख,फारुख शेख,राघव खिलारे,पांडुरंग भोसले,मा.उपसरपंच संजय भोसले यांनी अभिनंदन केले.