जागतिक अपंग दिनानिमित्त वाळुमाफियांवर कारवाईस मानसिकदृष्ट्या अपंग जिल्हाप्रशासनाच्या निषेधार्थ व जिल्हाप्रशासनातील प्रमुख रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत यासाठी जन आक्रोश आंदोलन

69

🔸बीड जिल्ह्य़ातील अतिरिक्त प्रभारी कारभारामुळे जिल्हाप्रशासन पंगु, प्रमुख पदे तात्काळ भरण्यात यावीत:- डाॅ.गणेश ढवळे

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.3डिसेंबर):-जिल्ह्य़ातील कोट्यावधी रूपयांचा महसुल बुडवून आर्थिक नुकसान करत वाळुमाफियांवर मेहेरबान महसुल व पोलीस प्रशासनातील आधिका-यांच्या बोटचेपी भुमिकेमुळे मानसिक दृष्टिकोणातुन अपंग जिल्हाप्रशासनाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३ डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्त हेलेन केलर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून संबंधित प्रकरणात जबाबदार प्रशासनातील वरिष्ठ आधिकारी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक बीड यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री, महसुल मंत्री, प्रधान सचिव महसुल व वनविभाग, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली आहे.

सविस्तर माहीतीस्तव:-बीड जिल्ह्य़ातील ईनामी जमिन गैरव्यवहार, मनरेगा, रेमडीसिवीर इंजेक्शन, महसुल,आरोग्य, जिल्हा पुरवठा, वनविभाग, नगरपरिषद आदि. विविध विभागातील गैरव्यवहार प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते यांनी निवेदने, आंदोलनानंतर तसेच विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी आदेश देऊन सुद्धा कोणतीही कारवाई करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ करत दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल व कारवाई करण्यास सक्षम नसणा-या मानसिक दृष्टिकोणातुन अपंग जिल्हाप्रशासनाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन करण्यात येत असून आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, सामाजिक कार्यकर्ते संदिप जाधव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे ऑल इंडीया पॅथर सेना मराठवाडा उपाध्यक्ष नितिन सोनावणे,बलभीम उबाळे, अशोक कातखडे निमगांव (मायंबा)शिरूर (कासार)कर,मोहम्मद मोईज्जोदीन,शेख मुबीन, शेख मोईन,सय्यद आबेद, सय्यद युसुफोद्दिन बीड आदि सहभागी आहेत.

बीड जिल्ह्य़ातील मातृसंस्था मानल्या जाणा-या बीड जिल्ह्य़ातील महसुल, आरोग्य, शिक्षण, कृषिविभागातील प्रमुख पदे वर्षोनवर्षे रिक्त असून अतिरिक्त प्रभारीपदामुळे प्रशासनातील कामाची गती मंद झाली असून नविन सत्तांतर झाल्यानंतर ६ महिन्यात रिक्त पदे भरण्याची घोषणा करून २ वर्षे झाली असून घोषणा हवेतच जिरली असुन प्रमुख पदे तात्काळ भरण्यात यावीत व प्रभारी कारभार संपुष्टात आणावा.