धम्मदान सर्व दानात श्रेष्ठ असुन धम्मदान देवुन बुध्दविहाराच्या माध्यमातुन धम्मचळवळ मजबुत करा- कवडु नगराळे

35
✒️बाळासाहेब ढोले(विशेष प्रतिनिधी)

यवतमाळ(दि.3डिसेंबर):– दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा यवतमाळच्या वतीने *सत्कार व धम्मदान सर्व दानात श्रेष्ठ असुन धम्मदान देवुन बुध्दविहाराच्या माध्यमातुन धम्मचळवळ मजबुत करा- कवडु नगराळे* कार्यक्रमाचे आयोजन बोधिसत्व बुध्दविहारात येथे करण्यात आले होते.सर्वप्रथम तथागत भगवान बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांचे पुजन प्रमुख पाहुण्याने पुष्पहाराने, मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित करुन करण्यात आले. आणि सामुहिक त्रिसरण पंचशील वंदना घेण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष रवि भगत जिल्हाध्यक्ष यवतमाळ, प्रमुख अतिथी म्हणुन कवडु नगराळे यवतमाळ, राहुल राऊत कोषाध्यक्ष, डाॅ. ललित बोरकर उपाध्यक्ष हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन भवरे यांनी केले.अॅड.गोविंद बन्सोड यांनी पुरस्कार प्रमाणपत्राचे वाचन केले.भगवान इंगळे पूर्व जिल्हाघ्यक्ष,यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे मार्गदर्शक अतिथी म्हणून कवडु नगराळे यांनी *विषय:”सब्ब दान धम्म दान जिनाति”* या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.ते म्हणाले सर्व दानात धम्म दान हे उच्च कोटीचे आहे.प्रत्येकांनी विहाराच्या माध्यमातुन धम्मदान देवुन धम्मचळवळ मजबुत केली पाहिजे.रवि भगत यांनी अध्यक्षीय भाषण केले.यानंतर दानदात्यांना बौध्द जीवन संस्कार पाठ पुस्तक व गुच्छ देवुन गौरविण्यात आले.बोधिसत्व बुध्द विहाराच्या बांधकामासाठी आज एकूण 66500/- रुपयाचे धम्मदान प्राप्त झाले.
यामध्ये संगिताताई कुंभारे (25000), स्वप्निल रवि भगत (10000), सांची कुसुम मोहन भवरे (10000), कान्होपात्रा देठे (5000), संध्याताई भगत (5000), मायाताई अडकणे (5000), खरेसाहेब (5000),प्रमिलाताई भगत(1500), इत्यादी दानदाते यांचा समावेश आहे.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रुपेश वानखेडे सरचिटणिस यांनी केले.रंजनाताई ताकसांडे उपाध्यक्षा यांनी आभार मानले.या कार्यक्रमास धम्मबांधव ,केंद्रीय शिक्षिका,केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य ,तालुका व जिल्हा शाखेचे पदाधिकारी व दानदाते उपस्थित होते .या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा शाखेच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.