धरणगांव तालुका पंचायत समीती शिक्षण विभागाकडुन ” जागतिक दिव्यांग दिवस ” साजरा

29

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.4डिसेंबर):- धरणगांव तालुका शिक्षण विभाग तसेच दिव्यांग मदत व पुर्नवसन केंद्रामार्फत गटसाधन केंद्रात ” जागतिक दिव्यांग दिन ” साजरा करण्यात आला . या प्रसंगी दिव्यागांना ” युडीआय ” कार्डाचे वाटप गटशिक्षण अधिकारी मा.अशोक बिऱ्हाडे साहेब यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी माळी समाजाचे कोषाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते व्ही.टी. माळी सर व मुकबधीर विद्यालयाचे प्राचार्य वाल्मीक पाटील सर प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.

अपंगाचा जीवनात चैतन्य निर्माण करणाऱ्या ” हेलन केलन ” यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. नंतर दिव्यांगांना शासनाचा वतीने दिले जाणारे ” युडीआय ” कार्ड वाटप करण्यात आले . ‘ या वेळी मा.गटशिक्षण अधिकारी यांनी मार्गदर्शन केले त्यांनी प्रतिपादन केले की, शारीरिक अपंगत्व पेक्षा मानसिक अपंगत्व जास्त हानीकारक असते. विज्ञानाचा माध्यमातुन शारीरिक अपंगत्वावर मात करता येते. प्रमुख अतिथी , व्ही.टी. माळी यांनी सांगितले की, दिव्यंगता ही शारीरीक समस्या असुन त्यांचा पुर्नजन्म , दैव, पाप – पुण्यांशी कोणताही संबंध नाही असे प्रतिपादन केले.

प्रास्ताविक गटसमन्वयक श्री. दिपक पाटील सर यांनी केले. यावेळी मुकबधीर शाळेचे भडांगे सर, नंदु पाटील, चद्रकांत पाटील, दिपक जाधव, किशोर पाटील तसेच गटसाधन केद्रांचे तज्ञ शिक्षक जयदीप पाटील, तुळशिराम सैदाणे, अतुल पाटील, अनिल पाटील, सर , राहुल वाणी , सौ. सविता वाघ मॅडम, भारती ठाकरे मॅडम, सविता बडगुजर मॅडम, श्री लोखंडे सर , त्याच प्रमाणे दिव्यांगा चे पालक उपस्थित होते. आभार किशोर पाटील यांनी मानले .