ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीची आढावा बैठक व पदग्रहण सोहळा चांदवड ला उत्साहात संपन्न

  42

  ✒️ नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

  नाशिक(दि.4डिसेंबर):-भारत सरकार नोंदणीकृत माणूसकी सोशल फाउंडेशन संचलित ग्राहक संरक्षण उपभोक्ता समिती आढावा बैठक व पदग्रहण सोहळा चांदवड येथील मातोश्री लाँन्स येथे घेण्यात आला.बैठकीत नव नियुक्त पदाधिकारी यांना समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.दादासाहेब केदारे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले,येणाऱ्या 24 डिसेंबर रोजीच्या राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन यावर यशस्वी चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब केदारे यांच्या भाषणाने व अंतोषजी धात्रक नाशिक जिल्हा उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसाचा केक कापून झाली.

  यावेळी समितीचे प्रमुख पदाधिकार मा.मन्सुरभाई मुलाणी राज्य मुख्य संघटक मा.जुबेरभाई शेख राज्य संघटक मा.रुपालीताई माळवे
  राज्य संर्पक प्रमुख मा.रंजनाताई भावसार अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र
  मा.संजय देशमुख नाशिक जिल्हाध्यक्ष,हर्षद गायधनी, जिल्हा संघटक, राजेंद्र भालेराव जिल्हा संपर्कप्रमुख,शरद लोखंडे उतर महाराष्ट्र उपाध्यक्ष, शांताराम भाऊ दुनबळे नाशिक जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष, उसमानभाई शेख येवला तालुका अध्यक्ष, देवीदास जाधव चांदवड तालुका अध्यक्ष, साहेब राव मोरे चांदवड उपध्यक्ष,आत्माराम वानखेडे, राहुल केदारे नाशिक रोड संघटक, कैलास पवार, प्रकाश वाढणे, दादा राव मोरे, सखाराम पगारे, विक्रम शिंदे, संजय जाधव,आदि उपस्थित होते.

  वरील कार्यक्रमाचे आयोजन महावीरजी संकलेचा (नाशिक ग्रा.जिल्हाध्यक्ष) आणि वसिमभाई कादरी (चांदवड ता. अध्यक्ष) यांनी केले, सर्व बैठकीत उपस्थितांना खेळीमेळीच्या वातावरणात योग्य मार्गदर्शन व उर्जा मिळाली, यापुढेही अशीच यशस्वी वाटचाल आपल्या संस्थेची राहील असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी केले