पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढून पत्रकारांच्या सुखदुःखात त्यांच्या पाठीशी उभा रहाणार-विजयकुमार व्हावळ

    34

    ?पुरोगामी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष विजयकुमार वाव्हळ यांचा केज येथे सत्कार कार्यक्रम संपन्न

    ✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185

    बीड(दि.6डिसेंबर):-पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजयकुमार वाव्हळ साहेब यांचे बीड जिल्हासह केज या ठिकाणी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजामाता,सावीत्रीबाई फुले,माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिव फुले शाहु आंबेडकर यांचे विचार तळागाळातील नागरिकांचे काम करण्यासाठी पुरोगामी पत्रकार संघ कटीबद्ध आहेत. असे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजयकुमार वाव्हळ सर म्हणाले .बीड जिल्हा पेक्षा केज तालुक्यात आंबेडकर चळवळ जोमाने चालू आहे. असे ते म्हणाले .

    पुरोगामी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल केज तालुका पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता. यावेळी पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संघटक भागवत वैध साहेब, पुरोगामी पत्रकार संघ बीड जिल्हा सचिव धिवार राजकुमार,केज तालुका अध्यक्ष दत्तात्रय मुजमुले, पुरोगामी पत्रकार संघ केज सचिव रंजित घाडगे, कार्याध्यक्ष नवनाथ पौळ , उपाध्यक्ष हानुमंत गव्हाणे, सदस्य आमोल सावंत ,शहर संघटक अनिल वैरागे महिला उधोग प्रदेश अध्यक्षा मनिषा ताई घुले,सुनिल पोकळे, कौशल्याताई थोरात, महादेव जोगदंड सह अन्य पदधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सचिव घाडगे रंजीत यांनी केले तर आभारप्रदर्शन अमोल सावंत यांनी मानले.