डाँ. पंजाबराव देशमुख कन्या महाविद्यालयात स्व. श्रावणजी बगमारे यांचा 21 वा स्मूतीदिन साजरा

40

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.6डिसेंबर):– स्थानिक डॉ पंजाबराव देशमुख कन्या कनिष्ट महाविद्यालय ब्रम्हपुरी तथा,डॉ पंजाबराव देशमुख कॉन्व्हेंट,डॉ पंजाबराव देशमुख नागरी सह पतसंस्था मर्या ब्रम्हपुरी, व श्री श्रावनजी बगमारे वाचनालय चांदली यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे प्रेरणास्थान स्व. श्रावणजी बगमारे(महाजन)यांची 21 वि स्मूतीदिन साजरा करण्यात आली . कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रकाशराव बगमारे होते.

प्रमुख अतिथी संस्थेच्या उपाध्यक्षा तथा कॉन्व्हेंटच्या प्राचार्या मनीषाताई बगमारे,महाविद्यालयाच्या प्राचार्या शारदाताई ठाकरे,जेष्ठ समाजसेवक भगवान कन्नके सर, नीलिमा गुज्जेवार , जयघोष सहारे, ठाकरे मॅडम, सय्याम मॅडम, फटींग मॅडम,व अन्य कर्मचारी उपस्थित होते .या प्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा प्रकाशराव बगमारे व महाविद्यालयाचे कर्मचारी गोवर्धन दोनाडकर यांनी स्व. श्रावणजी बगमारे (महाजन)यांच्या जीवन कार्यावर मोचक्या शब्दात विविध प्रकारचे उदाहरणे देऊन मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा.हेमलता बगमारे यांनी मानले.