जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

33

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलडाणा(दि.6डिसेंबर):-जिल्ह्यमध्ये पोलीस अधिकारी आणि अंमलदार आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षीत व साक्षर व्हावा या करीता पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांचे मागदर्शनाखाली प्रशिक्षक पुणे येथील आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ उल्हास केळकर व त्यांची चमू यांनी प्रभाहॉल पोलीस मुख्यालय येथे जिल्हयातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच महसुल विभाग व होमगार्ड यांचे करीता १ ते ४ डिसेंबर दरम्यान प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली.आपल्या देशामध्ये सध्या मानव निर्मित आणि नैसर्गीक आपत्ती मुळे अनेक नागरीकांचे जिवन धोक्यात आलेले आहे. First Responder म्हणुन जनता पोलीस दलातील प्रत्येक अंमलदारांकडे बघते. हे लक्षात घेतल्यास महाराष्ट्र राज्या मध्ये प्रत्येक अंमलदाराची जबाबदारी शतपटीने वाढलेली आहे.

दैनंदिन कामे संभाळून संकट काळामध्ये दृढनिश्चयाने आणि परिपुर्णतेने कार्य करण्यासाठी पोलीस दल कायम सक्षम आणि सबळ असावे या हेतुने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये भुकंप, सुनामी, विज कोसळणे, ढग फुटी, महापुर, साथीचे रोग यासारख्या नैसर्गीक आपत्ती मध्ये पोलीस दलाची कार्यवाही कशी असावी या बाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. मानव निर्मीत आपत्तीच्या संदर्भाने उदा. दंगल, जाळपोळ, दहशतवाद, बॉम्बस्फोट , रोड , रेल्वे विमान, यांचे भिषण अपघात या संबंधी त्वरीत घ्यावयाची काळजी मदत आणि सुटका या संबंधी विशेष माहीती तिन हजार स्लाईडच्या माध्यमातुन मराठी भाषेमध्ये पिपिटीच्या सहाय्याने देण्यात आली आहे. तिर्थक्षेत्रा मधील अनुभवातून आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे आणी यात्रा चेंगरा चेंगरी वरील उपाया योजना करणे बाबत माहीती देण्यात आली. लायींग अरेस्टर घरच्या घरी कसे तयार करावयाचे यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. फायर एस्टींगविशर या संबंधी माहीती देण्यात आली असून त्याचे रिफीलींग कसे करावयाचे यांचे तत्रज्ञानही कार्यशाळेत देण्यात आले. विज कोसळण्यामुळे खुप मोठ्या प्रमाणावर जिवित हाणी होत आहे.

हे लक्षात घेवुन नागरीकांम ध्ये विजा कोसळणे या संबंधी संपूर्णतः शास्त्रीय माहीती देण्यात आली असुन सुरक्षा उपाय या संबंधी सविस्तर माहीती देण्यात आली आहे.तसेच 60 फुट उंच नेटव्दारे इमारती मध्ये जावुन मदत आणी सुटका, पहिल्या व दुस-या मजल्यावरुन जम्पींग पॅडच्या सहाय्याने उडया मारुन सुटका करणे, उंच इमारती मधुन दोराच्या सहाय्याने जख्मी व्यक्तीना खाली आणने, परिधान केलेल्या कपडयावर 20 फुट आगीमधुन मदत आणि सुटका, दोराची सिद्धी तयार करणे, असेन त्या साधनामधुन 6 प्रकारचे स्ट्रेचर्स तयार करणे, जखमी व्यक्तींना उचलण्याच्या वेगवेगळया पध्दती, जागेवर बांधण्याची बैंडेजेस ( प्रथमोउपचार), फायर एस्टींगविशर तंत्रज्ञान आणि प्रणालीचा प्रत्यक्ष वापर इत्यादी प्रात्यक्षीक करुन माहीती देण्यात आली.सदर प्रशिक्षणचा समारोप ४ डिसेंबर रोजी पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया यांचे अध्यक्षतेखाली झाला.

सदर प्रशिक्षणाचा बुलडाणा जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, पुरुष व महिला पोलीस अंमलदार , महसुल विभागाचे अधिकारी / कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालयातील शोध व बचाव पथकातील कर्मचारी तसेच होमगार्ड असे 225 अधिकारी व अंमलदारांनी लाभ घेतला.सदर प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण करण्याकरीता अपर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कदम, पोलिस निरीक्षक गिरीष थाताड, पोलिस उपअधीक्षक गुलाबराव वाघ, पोलिस निरीक्षक बळीराम गिते, अनिल बेहेरानी , नामदेवराव शिंदे , शेख मोवीन, पोहेका शेख इद्रिस, संजय काळे, निजाम काझी, नापोको श्रीकृष्ण तायडे, पोहेकॉ सुनील पवार, गजानन नाटेकर, एएसआय असलम शेख, मपांना अर्चना इंगळे, निलेश रत्नपारखी, पोना राजदिप वानखेडे यांनी प्रयत्न केले.