म्हसवड सिद्धनाथ-माता जोगेशवरी रथोत्सव संपन्न;प्रशासकीय निरबंधामुळे भाविक आणि व्यापारी वर्गात नाराजीचे सूर

  42

  ✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

  म्हसवड(दि.6डिसेंबर):-कोरोना पार्शवभूमीवर प्रशासनाने घातलेल्या निरबंधात म्हसवड येथील सिद्धनाथ माता जोगेशवरी रथोत्सव यात्रा अल्प भाविकांच्या उपस्थितीत आज संपन्न झाली.
  आलेल्या भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करत आपल्या कुलदैवताचे मनोभावे दर्शन घेतले परंतु प्रशासनाने घातलेल्या निरबंधामुळे आलेल्या भाविक भक्तांच्यात नाराजीचा सूर उमतल्याचे दिसत होते.कोरोनाचे संकट असल्यामुळे शासनाने यात्रेस परवानगी नाकारली होती यात्रा व्हावी म्हणून ग्रामस्थानी आंदोलन केले अखेर ग्रामस्थाच्या विनंतीला मान देत प्रशासनाने यात्रा पटांगणामध्ये रथ ओढण्यास परवानगी दिली.

  यावेळेला सजवलेल्या रथामध्ये सिद्धनाथाची मूर्ती स्थापन करणेत आली व रथप्रदक्षिणेचे यात्रा पटांगणातच रिंगण पूर्ण करून रथ पूर्व जागेवर आणण्यात आला.यावेळी सिद्धनाथाचे मानकरी आनि भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.म्हसवड येथील श्री श्रीमंत अजितराव राजमाने,गोविंदराजे राजेमाने,सयाजीराजे राजेमाने,नगराध्यक्ष तुषार वीरकर यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.कोरोना पार्शवभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करत रथ प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली ‘सिद्धनाथाच्या नावं चांगभलं’ च्या गजरात भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करून आलेल्या भाविकांनी आपल्या राजाचे दर्शन घेतले.

  यात्रा होणार की नाही हा समभ्रम असल्याने कारणाने दरवर्षी यात्रेला भाविकांची संख्या ही 6 ते 7 लाखाच्या आसपास असते ती यावेळी वीस ते पंचवीस हजाराच्या घरात दिसली यात्रा अल्प प्रमात भरल्यामुळे व पोलीसांनी संपूर्ण शहरात नाकेबंदी केल्यामुळे स्थानिक व्यापाऱयांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले यादरम्यान प्रमुख रस्ते बंद केल्यामुळे आणि स्थानिक नागरिकांना व्यापाऱ्याना पोलीस म्हसवड शहरात सोडत नसल्याने आणि पोलिसांच्या आडमुठे पणामुळे नागरिक आणि पोलिसांच्या वाद होताना दिसत होते.पोलिसांच्या अरेरावी भाषेमुळे नागरिक आणि भाविक त्रस्त असल्याचे चित्र प्रत्येक नाक्यावर दिसत होते.सिद्धनाथ रथाची रथमार्गावरून प्रदक्षिणा पूर्ण न झाल्यामुळे भाविकाच्यात नाराजी दिसून आली. यावेळी नागरिकाच्यात चर्चा ऐकायला मिळत होती की पुढच्यावेळी असा काही प्रकार घडत असेल तर आता शांत बसायचे नाही भाविक यायचे ते आलेच मग यात्रा भरविली असती आणि रथाची नगरप्रदक्षिणा झाली असती तर काय झाले असते.

  यावेळी मंदिर परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने तपासनि केंद्र उभारण्यात आले होते भाविकांची तपासणी करून व लसीचे दोन डोस घेलेल्यानाच मंदिरात प्रवेश दिला जात होता.यात्रा असल्यामुळे म्हसवड नगरपरिषदेकडून म्हसवड शहराची स्वछता करण्यात आली होती व यात्रेकरूसाठी पाण्याची योग्य ती व्यवस्था करण्यात आली.यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शहरात सुमारे पाचशे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता पोलीस उपअधीक्षक डॉ. निलेश देशमुख व म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाययक निरीक्षक बाजीराव ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त पार पाडला.
  यावेळी यात्रा पटांगण व शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगण्यात आले.