प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची धुळे जिल्हा कार्यकारिणी जाहीर

    36

    ✒️धुळे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

    धुळे(दि.6डिसेंबर):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची धुळे जिल्हा कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हाध्यक्ष विक्रांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.कार्यकारिणी गठीत करण्यासाठी पत्रकार भवन, धुळे येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी समता समाज संघ धुळे जिल्हा अध्यक्ष किरण आण्णा गायकवाड यांची विशेष उपस्थिती लाभली.

    प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची धुळे जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत जगताप, जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉ प्रशांत साळवे, अशोक गवळी, मनोज तिसे, डॉ कैलास पाटील, संजय पवार, निलेश शिंदे, गणेश गवळी, सचिन बिऱ्हाडे, रविंद्र बोरसे, महेंद्र चांदणे आदि पदाधिकाऱ्यांची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून लवकरच या सर्व पत्रकारांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा कार्यकारिणीवरील पदे दिली जाणार आहेत.

    प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने धुळे जिल्हा कार्यकारिणी जाहीर केल्यामुळे संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक रिद्धी बत्रा, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, राजन नायर, श्रीकांत चौधरी, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ गायकर, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनीष नेरुळकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष प्रवीण राठोड, युवा संघटक सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, विदर्भ अध्यक्ष विजयकुमार बुंदेला, विदर्भ सरचिटणीस प्रा. शेखर बोरकर, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड. जितेंद्र पाटील, ॲड. देवराव तायडे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. संजय भिडे, विठ्ठल शिंदे, सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.