महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुरडी या गावी भैरव सामाजिक प्रतिष्ठान मार्फत शैक्षणिक साहित्याचे वाटप

    39

    ✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

    आष्टी(दि.६डिसेंबर):- हा दिवस भारत देश नव्हे तर संपूर्ण जगामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य इतक्या उच्च प्रतीचे आहे की,त्यांचा स्मृतिदिन साजरा करावा असे संपूर्ण जगाला वाटते म्हणूनच अमेरिकेच्या प्रसिद्ध विद्यापीठांमध्ये त्यांचा अडीचशे फूट उंचीचा पुतळा उभारला आहे.डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक,शैक्षणिक,राजकीय,आर्थिक व साहित्यिक या सर्व क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.या सर्व बाबीचा विचार करून प्रत्येक तळागाळातील लोकांपर्यंत त्यांचे कार्य फायदेशीर ठरले आहे.

    म्हणूनच तळागाळातील लोक त्यांचा स्मृतिदिन असो जयंती असो त्यांच्या विचारांचा वारसा चालवण्यासाठी हे उत्सव साजरे करतात,त्यांचा एक शब्द जीवनात बदल घडू शकतो.शिक्षणाच्या बाबतीत म्हटले आहे की,शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो निश्चितपणे गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.या त्यांच्या वाक्यामध्ये खूप काही ताकद आहे असे त्यांचे प्रत्येक क्षेत्रातील विचार समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी फायदेशीर ठरले आहेत.

    त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी भैरव सामाजिक प्रतिष्ठान कडून आष्टी तालुक्यातील सुरूडी या गावातील शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी उपसरपंच अशोक गर्जे,लहुजी विद्रोही सेनेचे नानाभाऊ वाल्हेकर व शाळेचे सर्व शिक्षक बंधू व गावकरी उपस्थित होते.