घटस्थापना करुन तपोभूमी गुंफा गोंदेडा येथे गुंफा यात्रा महोत्सवाची सुरवात

51

🔸कोरोना नियमाचे पालन करुन साधेपणाने महोत्सव सुरू

✒️नेरी प्रतिनिधी(नितीन पाटील)

नेरी(दि.13जानेवारी):-वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमीत सकाळी 8 वा घटस्थापना करून 62 व्या गुंफा यात्रा महोत्सवाला सुरवात झाली शासनाच्या कोविड नियमाचे पालन करून अगदी कमीत कमी गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत घटस्थापनेचा कार्यक्रम संपन्न झाला .वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी तपोभूमी गुंफा गोंदेडा येथे सुरू केलेला यात्रा महोत्सव सतत नियमित पणे सुरू असून यावर्षी 62 वा यात्रा महोत्सव 13 जाने ला घटस्थापना करून सुरुवात झाली ही घटस्थापना कन्हैयासिंग भोंड गुंफा यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी हभप सुधाकरजी चौधरी महाराज घटस्थापना ला उपस्थित होते .

सकाळी ग्रामसफाई सामुदायिक ध्यान करून घटस्थापना ला सुरवात झाली यावेळी विट्टल सावरकर ,डाँ शामजी हटवादे, सरपंच गिरजबाई गायकवाड गोंदेडा, नीलकंठ लोंनबले ,नत्थुजी भोयर ,भास्कर वाढई, रत्नमाला सोनूले ,प्रा राम राऊत सर,शेखर यादव, गिरीश भोपे ,दामोदर दडमल विठ्ठल वाढई ,विलास कोराम, हरिजी मेश्राम ,रामभाऊ बारापात्रे , वामन बोरकर, विनोद हटवादे , पांडुरंग अडसोडे, परशराम ननावरे , एकनाथ बोरकर ,सुधाकर निखारे ,भरत जाभुले ,दौलत घरत ,नामदेव घोडाम, रघुनाथ धारने ,वसंता घोडाम , रामदास बोरकर, देविदास जाभुले ,संदीप चौखे, सुखदेव ढोणे ,मधुकर वाढई आणि सर्व गुरुदेव भक्त उपस्थित होते.यानंतर भजनाच्या कार्यक्रमाला सुरवात झाली लगेच ग्रामगीता पाठांतर स्पर्धा घेण्यात आली सामुदायिक प्रार्थना व रात्रौ ला विठ्ठल वाढई यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कोरोनाच्या नियमाचे पालन करून अगदी साध्या पद्धतीने कार्यक्रम कमीत कमी गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत घेणे सुरू आहे.