आपले वीज बिल समजून घ्या “वेबिनार” संवादातून

28

पुरोगामी संदेश  न्यूज नेटवर्क

 

वीज ग्राहकांनी सहभागी व्हाव

महावितरणचे आवाहन

चंद्रपूर,दि.25 जून:

लॉकडाऊन काळातील तीन महिन्याचे वीज बिल एकत्रित आल्यामुळे घरगुती व वाणिज्य वीज ग्राहकांना विजबिल विषयी झालेला संभ्रम दूर करण्यासाठी व सदर ग्राहकांच्या वीज बिलविषयी असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महावितरण चंद्रपूर परिमंडळाद्वारा आपले वीज बिल समजून घ्या या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे शुक्रवार 26 जून रोजी सकाळी 11:30 ते दुपारी 1:30 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. तरीही परिमंडळाअंर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त (घरगुती व वाणिज्य) ग्राहकांनी सहभाग नोंदवून विजबिलाविषयी असलेल्या शंकाचे निरसन करून घेण्याचे आवाहन महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले आहे.

घरगुती व वाणिज्य ग्राहकांसाठी होणाऱ्या वेबिनारमध्ये महावितरणने वितरित केलेले माहे एप्रिल, मे व जून महिण्याचे वीज बिल विषयी असलेला संभ्रम व समस्यांचे निराकरणही करण्यात येणार आहे. वेबिनार मध्ये सहभागी होण्याकरिता महावितरणच्या https://meet.google.com/kbh-thhu-avb  या लिंकवर जाऊन घरगुती व वाणिज्य वीज ग्राहकांना सहभागी होता येईल. (उच्चदाब व औद्योगिक लघुदाब वीज ग्राहकांसाठी वीज बिल संदर्भात समस्या बाबत स्वतंत्रपणे वेबिनरचे आयोजन करण्यात येईल.)

ग्राहकांच्या वीज बिलाविषयी समस्याचे निराकरण करण्यासाठी “आपले वीज बिल समजून घ्या” या वेबिनारमध्ये चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे , अधिक्षक अभियंता  संजय वैद्य, रविंद्र गाडगे, सर्व कार्यकारी अभियंते, सर्व उपविभागीय अभियंते व बिलिंग विभागाशी संबंधित अधिकारीही सहभागी होणार आहे.  याशिवाय https://billcal.mahadiscom.in/consumerbill/  या लिंकवरही ग्राहक स्वतः आपल्या विजबिलाची पडताळणी करू शकतात.