✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपू,दि. 26 जून:ग्रामीणभागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपयोजनेसाठी आत्मभान अभियानांतर्गत जिल्हा परिषद नावीन्य पूर्ण उपक्रम राबवित आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभाग तसेच प्रकृती महिला विकास केंद्र चंद्रपूर यांच्या संयुक्त उपक्रमाने जिल्ह्यातील गावांमध्ये कोरोना विषयक जनजागृती करण्यात येत आहे.दिनांक 24 जून रोजी जिवती तालुक्यातील पाटागुडा, सितागुडा, घाटराई गुडा व जनकापुर कोलाम या गावांमध्ये गृहभेटी देऊन कोरोना विषयक जनजागृती करण्यात आली आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजना, वैयक्तिक स्वच्छता, दैनंदिन काम करीत असताना शारीरिक अंतर  याविषयीची माहिती नागरिकांना व्हावी या उद्देशाने प्रत्येक घरोघरी जाऊन जागृती विषयक पत्रके, स्वच्छते संदर्भात प्रात्यक्षिके यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

याविषयी ग्रामपंचायतीची स्थानिक गाव आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य, आरोग्य सेवा  समितीचे सदस्य, ग्राम दक्षता समितीचे सदस्य, आरोग्य सेवांवर लोक आधारित समितीचे सदस्य, महिला बचत गटातील सदस्य तसेच प्रकृती महिला विकास केंद्र चंद्रपूरचे जिल्हा समन्वयक निलेश देवतळे, तालुका समन्वयक अक्षय मधुकर गोरले यांचे चमू काम बघत आहे.

नागरिकांना कोरोनाच संसर्ग पसरविण्यासाठी, दक्षता घेणे नागरिकांमधील कोरोना विषयक असणारी भीती दूर करणे अर्थात कोरोना विषयक  संपूर्ण माहितीचे सर्वप्रथम संबंधित समितीच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण घेतल्यानंतर लोकसहभागाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत जिवती तालुक्यातील चार गावांमधील  90 घरी जाऊन कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये तसेच गाव कोरोना मुक्त कसे राहील यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. जनजागृती संदर्भातील उपक्रम प्रत्येक तालुक्यामध्ये, गावांमध्ये राबविण्याचे नियोजन आहे.

कोरोना ब्रेकिंग, चंद्रपूर, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED