गोंडपिपरी तालुक्यातील “आपले सरकार” सेवा केन्द्र चालक यांचा सत्कार

53

✒️नितीन रामटेके(विशेष प्रतिनिधी)

गोंडपिपरी(दि.8एप्रिल):;तालुक्यात आपले सरकार सेवा केन्द्रच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने केल्या जात आहेत. यात चार ग्रामपंचायतीचे आपले सरकार सेवा केन्द्र चालक यांच्या माध्यमातून ऑनलाईन कारभार जलद व पारदर्शकपणे सुरू आहे. या संगणक परिचालक यांची दखल घेत पंचायत समिती सभागृहात आयोजित सभेत सत्कार करण्यात आला आहे.

तालुक्यातील हिवरा ग्रामपंचायतीचे आपले सरकार सेवा केन्द्र चालक उमेश पुलगमकर, ग्रा.प सोनापूर देशपांडे आपले सरकार सेवा केन्द्र चालक सचिन पाल, चेकपारगाव आपले सरकार सेवा केन्द्र चालक प्रदीप चरडुके, व ग्रामपंचायत वडकुली चे आपले सरकार सेवा केन्द्र चालक अमोल येसनसुरे या चार ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केन्द्र चालक यांचा शाल आणि श्रीफड देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मा.विस्तार अधिकारी पंचायत अनिल शिंदे, व तालुका व्यवस्थापक आपले सरकार सेवा केन्द्र अमोल वानखेडे,पंचायत समिती केंद्र चालक अंकुश झाडे यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला.