विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नातून जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडून प्राथमिक आरोग्य केंद्र वरखेडा (दिंडोरी) यास अंबुलन्स भेट

134

✒️विशेष प्रतिनिधी(विजय केदारे)

नाशिक(दि.8एप्रिल):-महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष माननीय नामदार श्री.नरहरी झिरवाळ साहेब यांच्या प्रयत्नातून माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडून प्राथमिक आरोग्य केंद्र वरखेडा. तालुका दिंडोरी साठी ॲम्बुलन्स (फोर्स ट्रॅव्हलर ॲम्बुलन्स नॉन एसी बी एस व्ही आय) (4/4/2022)रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र यास मिळाली प्राथमिक आरोग्य केंद्रावर ॲम्बुलन्स आल्यावर सौ.सुरेखा घोडे सिस्टर व गावात आशा वर्कर सौ. कविता लिलके त्यांनी पूजा केली.

यावेळेस वरखेडा गावातील पोलीस पाटील कैलास बलसाने ग्रामपंचायत क्लार्क भाऊसाहेब ऊफाडे, विलास पडोळ, गोविंद आहेर, राजेंद्र वाघले राहुल कस्तुरे आदी उपस्थित होते व आदीनी माननीय नामदार नरहरी झिरवाळ साहेब व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आभार मानले