अयोध्येतील महंताकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना अयोध्या भेटीचे निमंत्रण

27

✒️जगदीश का.काशिकर(मो. ९७६८४२५७५७)

मुंबई: अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत बृजमोहन दास यांनी आज टिळक भवन, दादर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले.

अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत बृजमोहन दास यांनी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे भेट देऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला भेट देण्याचे निमंत्रण दिले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला.