चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत पथदिव्याची बंद केलेली विज जोडणी तात्काळ करा

35

🔸म.रा.वि.वि.कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा दिला इशारा

🔹ग्राम संवाद असोसिएशन (संघ) चामोर्शी तालुका अध्यक्ष – निलकंठ निखाडे

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालुका प्रतिनिधी)मो:-९४०४०७१८८३

चामोर्शी(दि.19मे):-दिनांक १८.०५. २०२२ पासून चामोर्शी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अंतर्गत दिवे बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ग्रामपंचयातला कोणतीही पूर्वसूचना किंवा कोणतेही पत्र व्यवहार न करता मनमानीने म.रा.वि. वि. कंपनीने विज तोडणी केलेली आहे. परंतु ग्रामपंचायतीकडे पथदिव्यांचे विज माहे एप्रिल २०२१ ते आजपर्यंत कोणतेही विलाबाबत माहीती दिलेली नाही.यापूर्वी ग्रामपंचायत पथदिव्यांचे विदयुत बिल शासनामार्फत भरल्या जात होते.पण सन २०२२ पासून म.रा.वि.वि.कंपनी ग्रामपंचयात कडे तगादा लावुन बिल भरण्याकरीता त्रास देत आहेत. परंतु ग्रामपंचायती कडे स्वतःउत्पनाचा कोणतेही साधन नसल्याने आणि दिव्यांवरील येणारा विदयुत बिल भरणा करणे ग्रामपंचायतीना शक्य नाही.

त्यामुळे ग्रामपंचायती कडील पथदिव्यांचे विदयुत बिल भरणा करणे शासनाने अधिनस्त येत असून, म.रा.वि.वि. कंपनीने महाराष्ट्र शासनाकडून पथदिव्यांचे विदयुत बिलाचे संदर्भातील अडचणी दूर कराव्यात चामोर्शी तालुक्यातील पंचदिव्याचे तोडणी केलेले विद्युत आज दिनांक १९.०५.२०२२ जोडणी करण्यात यावे, अन्यथा ग्राम संवाद सरपंच (संघ) असोसिएशन कडुन म.रा.वि.वि.कंपनीच्या विरोधात तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्राम संवाद सरपंच (संघ) असोसिएशन चामोर्शी तालुका अध्यक्ष श्री. निलकंठ पाटील निखाडे यांनी दिला आहे…..