सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग निकृष्ट कामामुळे ५ महिन्यातच उखडला डागडुजीचा केवळ फार्स, नितिन गडकरी यांना तक्रार:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

29

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.19मे):- सोलापूर ते औरंगाबाद मार्गे धुळे एन. एच.२११ राष्ट्रीय महामार्ग अंदाजे किंमत १००० कोटी अवघ्या ५ महिन्यातच औरंगाबाद जवळ कसाबखेड फाट्यावर मार्गावरील डांबर उखडले असुन २४ एप्रिल २०२२ रोजी औरंगाबाद ते करोडीमार्गे तेलवाडी मार्गाचे लोकार्पण करण्यात आले होते. खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याचे फाट्यावरील हाॅटेल व्यावसायिकांनी सांगतानाच काल रस्ताडागडुजीच्या नावाखाली उखडलेले डांबर रस्त्यावरून बाजुला सारून केवळ थातूरमातूर काम करत फोटो काढुन घेतल्याचे सांगितले .

६० किलोमीटर रस्तेकामासाठी १००० कोटी खर्च तरीही ५ महिन्यातच रस्ता उखडला
_____
कंत्राटदार कंपनी एल अ‍ॅण्ड टी कंत्राटदार कंपनीने निपानी ते औरंगाबाद ३० किलोमीटर साठी ५०० कोटी तर दिलिप बिल्डकाॅन या कंत्राटदार कंपनीने करोडी ते तेलगाव पर्यंत ५१२ कोटी असा १००० कोपीतुन ६० किलोमीटर रस्ता तयार केला आहे. कंत्राटदाराकडे ४ वर्षे देखभाल दुरूस्ती असून १३ कोटी रूपयांची ईएमडी (सुरक्षा ठेव) एनएचआय कडे असून मार्गाची पाहणी करून दुरूस्ती करण्यात येईल असे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी सांगितले.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी यांना तक्रार :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
____
राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट झाल्युळेच ५ महिन्यातच डांबरीकरण उखडले असुन निकृष्ट रस्त्याप्रकरणात संबधित कंत्राटदार कंपनी एल अ‍ॅण्ड टी आणि दिलीप बिल्डकाॅन यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच संबधित कामाची देखरेख करणारे अभियंते यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी यांना केली आहे.