प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान

23

🔸गुरुपौर्णिमा निमित्त केले होते आयोजन

✒️औरंगाबाद(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

औरंगाबाद(दि.15जुलै);-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, औरंगाबाद जिल्हा शाखेचे वतीने गुरुपौर्णिमा निमित्त उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.जिल्हा परिषद हायस्कूल वाकी तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद उत्कृष्ट शाळेतील कर्तबगार व मेहनती शिक्षकवृंद यांची दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने संघाचे औंरगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्ष सतिश लोखंडे यांनी गुरूपौर्णिमा निमित्त उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान केला आहे.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर शिक्षक माटेसर, शेळके, डगळे, शिंदे, मानवहित लोकशाही पक्षाचे पदाधिकारी कारभारी लोखंडे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी आणि पालक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सुध्दा शिक्षकांचा सत्कार केला.

चिखलाच्या गोळापासून आकार देत एक आदर्श नागरिक घडवणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे शिक्षक. विद्यार्थ्यानी उघड्या डोळ्यांने स्वप्न पहावी, ती सत्यात उतरवून आपल्या आई- बाबा, समाज, गाव, तालुका, जिल्हा, राज्य व देशाचं नाव लौकिक करावं अशा अपेक्षेने धडपड करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान व्हावा ही प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मनोमन इच्छा आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमा निमित्त शिक्षकांचा यथोचित गौरव करण्यात आला. याप्रंसगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.