प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

33

🔹करमाळा तालुका शाखेच्या वतीने आयोजन

✒️करमाळा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

करमाळा,सोलापूर(दि.18जुलै):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र राज्य या संघाच्या करमाळा तालुका शाखेच्या वतीने १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा शनिवार दि.२३ जुलै, २०२२ रोजी पंचायत समिती सभागृह, करमाळा, जिल्हा सोलापूर येथे दुपारी १२.३५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.सदर सन्मान सोहळा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या प्रेरणेने, सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा आशाताई चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.

हा सन्मान सोहळा करमाळाचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून करमाळा तालुक्याचे तहसीलदार समीर माने, पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, बालविकास प्रकल्प अधिकारी व्ही. एन. माने, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश (भाऊ ) करे -पाटील, ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष ॲड. डॉ. बाबुराव हिरडे उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, मराठवाडा संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापुरकर, दैनिक साहित्य सम्राटचे मुख्य संपादक पंडीत हणमंते, संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, पुणे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब लोखंडे, लातूर जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, ग्लोबल सायन्स इंस्टिट्युट, करमाळाचे संस्थापक महेश निकत, संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष पंकज धायगुडे-पाटील, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कल्याण देहाडे, लोकस्वराज्य प्रतिष्ठान करमाळाच्या अध्यक्षा ॲड.सविताताई शिंदे,दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार तथा माढा तालुका शिक्षण सल्लागार समितीचे सदस्य धनंजय मोरे, पदमाळे क्लासेस करमाळाच्या संचालिका ॲड. अपर्णाताई पदमाळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

हा सन्मान सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा आशाताई चांदणे, जिल्हा उपाध्यक्षा विजया कर्णवर, जिल्हा सचिव प्रमिला जाधव, तालुका अध्यक्ष बाळासाहेब भिसे, जेऊर शहर अध्यक्ष आबासाहेब झिंजाडे, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब शिंदे, तालुका सचिव अक्षय वरकड, तालुका संपर्क प्रमुख प्रमोद खराडे, संघाच्या सदस्या माधुरीताई कुंभार, सदस्य अंगद भांडवलकर, धनंजय पाटील ,संजय चांदणे, श्रीमंत दिवटे आदी पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.या गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्यासाठी करमाळा तालुक्यातील सर्व नागरिक, पालक व विद्यार्थ्यानी उपस्थित रहावे असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, करमाळा तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे .