महामुंबई परिसरातील ओबीसी दि. बा. पाटील नामकरण आंदोलनामुळे संघटित झाले!

33

चातुर्वर्ण्य व्यवस्था त्यातून निर्माण झालेली जातीप्रथा नष्ठ झाली पाहिजे.देशात समता आली पाहिजे.असे अनेकांना वाटते.परंतु हे काम अत्यन्त अवघड आहे.ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्चवर्णीयांना सर्वाधिकार देणारी मनुस्मृती रायगड जिल्ह्यात जाहीर पणे जालळी गेली.ज्या उच्चवर्णीयांना ही प्रचंड फायद्याची होती त्या ब्राह्मण जातीच्या माणसाकडून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली.ही कृती,आजच्या दि बा पाटील नामकरण आंदोलनातील सहभागी असलेल्या ओबीसी आगरी कोळी कराडी भंडारी अर्थात शूद्र जातीसाठी महत्वाची होती.मनुस्मृतीच्या कायद्याने ओबीसींना फक्त उच्चवर्णीय लोकांची सेवा करावी.गुलामी करावी.या ओबीसी एससी एसटी आणि स्त्रिया यांच्यावर लादलेल्या गुलामीच्या निषेधार्थ महाड रायगड येथे हे मनुस्मृती दहन करण्यात आले.

आमच्या देशावर परक्या इंग्रजांनी लादलेल्या राजकीय गुलामीतून जे शोषण होत होते.त्याचप्रमाणे धार्मिक चालीरीती ज्या पिढ्यानपिढ्या कोकणासह साऱ्या देशात चालू होत्या त्याला आग लावण्याचे ऐतिहासिक काम या मनुस्मृती दहनाने रायगड जिल्ह्यात झाले.आमची देशांतर्गत गुलामी आजच्या हिंदुत्व आणि त्याच्या आड लपलेल्या ब्राह्मण्यात आहे.हे त्याकाळातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत सख्ख्या भावाप्रमाणे उभ्या राहिलेल्या आगरी नेते नारायण नागु पाटील या पेझारी अलिबाग येथील आमच्या आगरी नेतृत्वास कळले होते.प्रचंड जातीभेद असणाऱ्या त्या काळात आगरी कोळी ओबीसींना जमिनीचा,पाण्याचा,जंगल शिक्षण आणि राजकीय अधिकार देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकांना समजत होते.परंतु हे सर्व अधिकार मनुस्मृती धर्माची गुलामी संपल्याशिवाय मिळत नसतात.ही अवघड गोष्ट स्वतःस समजूनही इतरांना सांगणे म्हणजे धार्मिक बंड करणे होय.त्यामुळे कुलकायद्यांचे आंदोलन यशस्वी करणारे नारायण नागु पाटील आपल्या व्यतिगत जीवनात डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्ण पणे समजून घेऊन लढले.

नारायण नागु पाटील यांच्या पेझारी अलिबाग येथील घरी पंचवीस पंचवीस दिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर राहिले आहेत.भारतीय संविधानाचा काही भाग त्यांनी या निसर्गरम्य अलिबागच्या ना ना पाटील यांच्या घरी बसून लिहिला असे जाणत्या लोकांच्या तोंडी ऐकले आहे.अर्थात जमीन पाणी जगलं यांच्या हक्कांचे कायदे जनांदोलनातून रायगड जिल्ह्याच्या संघर्षमय लढ्यातून पुढे आलेले आहेत यात कुणालाही शंका नको.रायगड जिल्ह्याच्या याच लढाऊ पार्श्वभूमीवर आगरी ओबीसी जातीतून दोन महान नेते मिळाले.एक होते नारायण नागु पाटील यांचे जेष्ठ चिरंजीव ख्यातनाम विधितज्ञ ऍड दत्ता पाटील.जे पुढे महाराष्ट्र विधानसभेत विरोधीपक्ष नेते झाले.दुसरे होते नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते ऍड दि बा पाटील साहेब.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कोकणातील खोती विरोधी लढ्याचा समारोप करताना तत्कालीन इंग्रज राजवटीत कूळ कायद्याचा मसुदा लिहिला.अर्थात जागतिक कीर्तीचा बॅरिस्टर झालेला वकील आम्हा आगरी कोळी कुणबी भंडारी या कुळांना मिळणे ही अशक्य प्राय गोष्ट होती.देशातील बलाढ्य ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या विरोधात लढण्याचीच काय ब्र काढण्याची हिम्मत त्यावेळी कोणत्याही ओबीसींची नव्हती.आजही असा वकील आमच्या कडे नाही हे वास्तव आहे.आजही जमिनी पाणी जगलं शिक्षण आरक्षण राजकीय सत्ता रोजगार यांचे सर्वाधिकार उच्चवर्णीय ब्राह्मण मराठा वैश्य या जातींकडे केंद्रित झाले आहेत.वर्तमान महाराष्ट्र सरकार मद्धे मुख्यमंत्री मराठा एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी ओबीसींवर जे अत्याचार चालविलेत त्यांच्या विरोधात कुणी लढू नये यासाठी विरोधी पक्ष म्हणून वाट अडविणारे मराठा अजित दादा बसलेत.

स्वातंत्र्यपूर्व काळात राजर्षी शाहू महाराज आणि महाराज सयाजीराव गायकवाड हे दोन क्षत्रिय राजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे उभे होते.अर्थात त्यांचे शिक्षण इंग्रज अधिकारी, शिक्षक प्राध्यापक यांच्या कडून झाल्यामुळे शूद्राती शूद्र समाजा बरोबर न्याय केला पाहिजे.असा त्यांचा समतेचा स्वभाव घडविला गेला होता.इंग्रज हे राजकीय दृष्टींने भारताचे शत्रू दिसत असले तरीही ते विज्ञानवादी नव्या जागतिक जीवन मूल्यांच्या शिक्षणामुळे येथल्या स्त्रिया ओबीसी एससी एसटी यांच्यासाठी नव्या जगातील सुधारक ठरले.याच इंग्रजी शिक्षणातून घडलेले ओबीसींचे “महात्मा” जोतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्री माई फुले यांनी देशातील समस्त स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला.शिक्षणाने माणूस घडतो,बदलतो ही सिद्ध झालेली गोष्ट महाराष्ट्र जाणतो.महाराष्ट्राच्या धर्म सुधारणावादी राजकीय जीवनाची वाट गुजरातने कशी लावलीय? देश आणखी किती मंदीत बेरोजगारीच्या खाईत बुडतोय हे जागृत नागरिकांच्या लक्षात आले असेलच.

आज केंद्रीय स्तरावर हिंदुत्वाच्या नावावर जो तमाशा चालू आहे त्यातून महाराष्ट्रात ईडीने अधोरेखित केलेल्या भ्रष्ठ लुटारु मराठी आमदारांचे गुजराती सरकार महाराष्ट्राच्या माथी मारण्यात आले आहे.ज्या लोकप्रतिनिधींना हे सरकार आणण्यासाठी चोरी छिपे गुजरात गुहावटी गोवा मार्गे विधानसभेत यावे लागते त्यांच्याकडून लोकांनि प्रामाणिक पणाची अपेक्षा कशाच्या आधारे ठेवायची?. अशा बिकट परिस्थितीत ज्यांचे नाव लोकप्रतिनिधी म्हणून साऱ्या देशाने घ्यावे असे लोकनेते दि बा पाटील यांचे नाव आम्ही संघर्ष करून नवी मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळ प्रकल्पास लावले, ही अत्यन्त अभिमानास्पद गोष्ठ आहे.त्यातही देव, आत्मा, चमत्कार, स्वर्ग, मनुस्मृती नाकारणाऱ्या दि बांचे नाव आरक्षणाला कायम विरोध करणाऱ्या हिंदुत्व सांगून ब्राह्मणी अजेंडा राबविणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पराभव करून पुढे आलेय.आजच्या ओबीसींच्या गुलामीचे खरे कारण भाजपचे राष्ट्रीय हिंदुत्व आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे शिवसेना पुरस्कृत हिंदुत्व म्हणजेच ब्राह्मण्य हेच आहे.

ओबीसींच्या खऱ्या गुलामीचे हे कारण, कोणतेच ओबीसी नेते स्वीकारणार नाहीत. दि बा पाटील हे स्वातंत्र्या नंतरचे असे नेते होते की त्यांनी हे हिंदुत्व नाकारले होते. काहीजण असे म्हणतात की मग ते एकदा शिवसेनेतून निवडणूक लढले होते.ते खरे आहे. परंतु मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या वडिलांचा म्हणजे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा भव्य पुतळा उभा करावा अशी मागणी करणारे देव आणि हिंदुत्व नाकारणारे ते एकमेव आमदार होते.म्हणजेच प्रबोधनकारांचे विचार घेऊन चालणारा त्यांचा मुलगा आहे असा त्यांचा समज होता. आज एकनाथ शिंदे बाजूला भटजी घेऊन पूजा सांगणाऱ्या पत्रकार परिषदा घेतात त्यावरून लोकांना काय मेसेज जातोय?. त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे मनोहर जोशींच्या सल्ल्याने शिवसेना चालवीत होते.यामुळेच 1996 साली शिवसेना भाजप युतीचे सरकार आल्यानंतर आम्ही कोकणात ब्राह्मण खोता विरोधात जीवघेणा संघर्ष करून तयार केलेल्या कुळ कायद्यांची अंमळ बजावणी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी थांबविली.

ब्राह्मण क्षत्रिय जातींची जमीनदारी पेशवाई खोती टिकविण्यासाठी शिवसेनेचा वापर करणारे जोशी आम्हा आगरी कोळी भंडारी आमदार खासदार नगरसेवक यांना आजही कळले नाहीत.सामान्य ओबीसींना हे कळण्यासाठी कोकणात म्हणजे ठाणे पालघर मुबई नवी मुंबई रायगड येथील 1957 पूर्वीचे आणि आताचे सातबारा नव्या पिढीने अभ्यासावेत.आमची सातबऱ्यावरची गुलामी लगेच समजेल.मुंबईचे कोळीवाडा गावठाण आंदोलन समजून घ्यायचे असेल तर चरी शेतकरी संप आणि डॉ.बाबासाहेब आबेडकर वाचलेच पाहिजेत.मुबंईतल्या कोळीवाडा गावठाण चळवळीतील लोकांना आजही कुळ कायदा,सेझ आंदोलन,सिडको आंदोलन याविषयी प्रचंड ऍलर्जी आहे.अर्थात कट्टर हिंदुत्वाच्या प्रभावात जन्मलेली ही पिढी दि बा पाटील साहेबाना समजू शकलेली नाही.त्यामुळे 2016 ते 22017 मधल्या काळात मी मुबंई च्या कोळीवाड्यात प्रवेश करण्यापूर्वीच सारे कोळीवाडा गावठाण आणि झोपडपट्टीस SRA घोषित करण्यात महाराष्ट्र विधान सभेने ठराव घेतला होता.

मुंबई महानगर पालिकेतील शिवसेनेची कुंडली लिहिणारे मनोहर जोशी असताना मा उद्धवजी ठाकरे यांनीही “मम्” म्हणून। SRA ला मूक सम्म्मती दिली असणार? यामुळेच सायन कोळीवाडा सुधाकर शेट्टी ला विकला गेला. तो मुबई महानगर पालिका प्रशासन आणि पोलीस यांच्या शुभ हस्ते.अर्थात ब्राह्मण जोशी आणि मराठा एकनाथ शिंदे यांनी संघटनेस चुना लावल्या नंतर हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या व्याख्येत ओबीसी एससी एसटी आणि आमच्या मातृसत्ताक आगरी कोळी भंडारी महिला येतात का?.यावर खुली चर्चा शिवसेना भवनात लावावी,अशी विनंती मी मा उद्धवजी ठाकरे यांना करीत आहे.त्याचप्रमाणे नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मा नितीन गडकरी फडणवीस,आणि मोहन भागवत यांना ही करीत आहे.
कॉग्रेस राष्ट्रवादी च्या लोकांना मराठा तितुका मेळ वावा आणि ओबीसी लोळवावा,हा आदेश चारही शंकराचार्य देऊन गेले असावेत? अट्रोसिटी कायद्याची सुरक्षा आमच्या एससी एसटी भावाना नसती तर स्थिती फार भयानक असती?.आज दि बा पाटील साहेबांच्या नामकरण आंदोलना निमित्त “घरात नाही पीठ कशाला हवे विद्यापीठ?” अशी उच्चवर्णीय मग्रुरी आमच्या मागासवर्गीय भावानंप्रमाणे आम्हाला ऐकायला मिळाली नाही. अर्थात मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन ही प्रत्येक मागासवर्गीय ओबीसी एससी एसटी जातीसाठी प्रेरणा देणारी चळवळ आहे.

देशातल्या प्रत्येक वास्तूला इमारतीला आमच्या उच्चवर्णीयाचेच नाव देणार?सर्व पुरस्कार हे उच्चवर्णीय लोकांनाच. सारे श्रेष्ठ लोक ब्राह्मण क्षत्रिय वैश्य याच जातीत जन्माला येतात .या मनुस्मृतीच्या कपाळ करंटया सिद्धांताची वाट भीमा कोरेगावच्या लढाईत आमच्या शूर सैनिकांनी लावली .ते जन्माने क्षत्रिय नसताना शूर ठरले.ब्राह्मण क्षत्रिय 28 हजार सैन्याचा पराभव करणारे 500 शूरवीर ठरले. अर्थात मागासवर्गीय लोकांच्या पराक्रम आणि शूरतेस पूर्ण न्याय देईल असे शब्दच मराठी भाषेत दिसत नाहीत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यांचा वैचारिक वारसा चालविणारे दि बा पाटील यांची नावे सार्वजनिक स्थळांना देण्यासाठी संघर्ष अटळ आहे.अर्थात मनुस्मृती आणि प्रचलित हिंदुत्वाने आम्हा मागास ओबीसींना मानवी मान,प्रतिष्ठता,सन्मान नाकारला आहे. हे या लढयामुळे आम्हाला कळले आहे. प्रत्यक्ष नांगर धरून जमीन कसणार्या आमच्या ओबीसी स्त्री पुरुषांना जमीन मालकी नाकारली होती! हे आजच्या पिढीला सांगायलाच हवे.कुळ कायद्याने मिळालेली जमीन हा डॉ.बाबासाहेब आबेडकरांचा विजय आहे. म्हणूनच “आम्ही खातो त्या भाकरीवर बाबा साहेबांचे नाव हाय र”..हे सांगणारी माझी बहीण कडूबाई खरात ही देशाच्या सविधांनकाराशी कृतज्ञ आहे. म्हणून “महाराष्ट्र भूषण” पुरस्कारास पात्र ठरेल.आबेडकरी कवी गायक यांच्याकडून आमच्या ओबीसी कवी गायकांनी आदर्श घ्यावा. आमच्या शेतकरी चळवळीची गाणी लिहावीत.

आबेडकरी चळवळी प्रमाणेच,ओबीसी चळवळ आहे. नव्हे ओबीसी हकांची चळवळ ही डॉ आंबेडकर यांच्या नावाने ओळखली जावी.हिंदुत्वाचा या आमच्या ओबीसींना विरोधच असणार? आज मी हे बोलतोय लिहितोय ते दि बांच्या नामकरण आदोलणामुळेच. मागासवर्गीय ओबीसी जातींनी पहिल्यांदा जात म्हणूनच संघटित व्हावे.एक जात दुसऱ्याचे ऐकत नाही.मुक्ती कोण पथे?या भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकर आम्हाला मुक्तीचा मार्ग आणि वस्तुस्थितीचे मर्म सांगतात.जमीन पाणी जगलं मनुस्मृती दहन यात सोबत राहणारे समस्त मागासवर्गीय लोक एक असते तर आज देशात संविधानिक “अडाणी” अज्ञानी लोकांचे सरकार नसते? आमचे सरकार नसल्यामुळेच आज सर्व क्षेत्रात आमच्यावर अन्याय अत्याचार सुरू आहेत.मंडल आयोगाने जाहीर केलेली आमची 52 टक्के लोकसंख्या आज किमान 60 टक्के तरी वाढायला हवी होती.परंतु या नालायक सरकारने आमच्या जित्या जागत्या ओबीसींना 37 टक्क्यांवर आणून अर्ध्या लोकांना मृत किंवा गायब केले आहे.ओबीसींची मानवी अस्तित्वाची एव्हढी निंदा जगात कुठेही सरकारी पद्धतीने झाली नसावी?.या बिकट परिस्थितीत हिंदुत्वाला नमऊन आम्ही लाखोंच्या संख्येने एकत्र आलो.ठाणे पालघर मुंबई नवी मुबई रायगड येथील सारे ओबीसी सागरपुत्र आगरी कोळी भंडारी कराडी लोकांना दि बा पाटील यांच्या रूपाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मिळाले.

प्रत्येक ओबीसी जातीत असे दीबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर लपले आहेत. आमच्या मुक्ती दात्याना आम्ही ओळखले पाहिजे.संघटित होऊन आपले अस्तित्व दाखविले पाहिजे.या आंदोलनात रस्त्यावर उतरलेल्या आणि आपल्या मनातून पाठींबा देणाऱ्या सर्वच भावा बहिणीचे मी मनःपूर्वक आभार मानतो. केंद्र आणि राज्यातील सरकार पोलीस प्रशासन यांचेही आभार.
जालियनवाला बाग हत्याकांड,जासई सिडको आंदोलन,रमाबाई नगर हत्याकांड यासारखी बंदुकीच्या गोळ्या घालून जी आंदोलने याअगोदर चिरडली गेली.तसे काही वाईट झाले नाही.भारतीय लोकशाहीत संविधानिक आंदोलने करणाऱ्या नागरिकांचा आदर शासनाने नेहमीच करावा.भारतीय लोकशाहीची प्रतिष्ठा साऱ्या जगात उंच उंच व्हावी! ही सदिच्छा व्यक्त करतो.

✒️सुलोचनापुत्र:-राजाराम पाटील(केगाव उरण.जिल्हा-रायगड)मो:-8286031463