शुन्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्तीमत्व भगवानजी गेडाम

  144

  🔸वाढदिवस निमित्ताने वृद्धाश्रमात वस्त्र दान

  ✒️गडचिरोली (पुरोगामी संदेश नेटवर्क)

  गडचिरोली(3जुलै):- साप्ताहीक विश्वयोगचे संपादक भगवानजी गेडाम यांच्या 61 व्या वाढदिवसा निमीत्य मातोश्री वृध्दाआश्रम मधील वृध्दांना गडचिरोली जिल्हा सर्वोदय मंडळाच्या वतीने वस्त्रदान करण्यात आले .

  वस्त्रदान कार्यक्रम प्रसंगीं सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष्‍ा प्रा.देवानंद कांबळी,अंधश्रदा निर्मुलन समितीचे अध्यक्ष विलास निंबोरकर, ग्रामगिताचार्य बंडोपंत बोडेकर, सर्वोदय मंडळाचे सचिव तुलारामजी नैताम ,कांग्रेस कमेटीचे शहर अध्यक्ष्‍ा राकेश रत्नावार, सायकल स्नेही मंडळाचे प्रा.विलास पारखी उपस्थित होते.

  सर्व उपस्थित मांन्यवराने भगवान गेडाम यांच्या कार्या विषयी गौरव पर भाषने झाली .आणि त्यांना पुढिल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या व गौरव करण्यात आला.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंधश्रदा निर्मुलन समितीचे सचिव प्रा.पुरुषोत्तम ठाकरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पोटेगाव जंगल कामगार संस्थेचे व्यवस्थापक धनराज देवतळे यांनी केले. कार्यक्रमात सोशल डिस्टेगीचे पालन करण्यात आले.