यजनेश शेट्टी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एम्प्टी हँड कॉम्बॅट’ चे कॉस्मो जिमिकचा”लाइफ ऑफ ए डोजो मास्टर” डॉक्युमेंटरी फिल्म ऑनलाईन प्रदर्शित

114

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.9ऑगस्ट):- कुंग फू मास्टर कॉस्मो जिमिक अमेरिकेतून मुंबईत आला आणि 8 ऑगस्ट 2022 रोजी कर्मवीर स्पोर्ट्स क्लब, अंधेरी (पश्चिम), मुंबई येथे चीता यजनेश शेट्टी यांच्यासोबत एक भव्य पत्रकार परिषद आयोजित केली, जिथे कॉस्मोच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंट्री फिल्म ‘लाइफ ऑफ डोजो मास्टर’ ऑनलाईन प्रदर्शित करण्यात आली. हे चीता जीत कुन डू ग्लोबल स्पोर्ट्स फेडरेशन आणि एम्टी हँड कॉम्बॅट यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करण्यात आले. आजच्या काळासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंटरी चित्रपट आहे, जो लोकांना काहीतरी करण्याची प्रेरणा देईल, असे त्यांचे म्हणणे आहे. कॉस्मो जिमिक,सारा लँग जिमिक,सगून वाघ,श्रीदेवी शेट्टी वाघ,अमरजीत शेट्टी आणि चीता यजनेश शेट्टी यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

“लाइफ ऑफ ए डोजो मास्टर” ही मास्टर कॉस्मो जिमिकच्या आयुष्यातील एका आठवड्याची कथा आहे, ज्याचा जन्म भारतातील मणिपूर या दुर्गम भागात झाला आणि नंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला. ग्रँडमास्टर चीता यजनेश शेट्टी, संस्थापक, चीता जीत कुन डू ग्लोबल स्पोर्ट्स फेडरेशन, ज्यांनी मास्टर कॉस्मोला 8 व्या पदवीचा ब्लॅक बेल्ट प्रदान केला आहे, यजनेश शेट्टी म्हणतात,”हा माहितीपट लोकांना काहीतरी करायला शिकवतो आणि त्यामुळे त्यांचे मनोबल वाढेल. कॉस्मो जिमिक जगासमोर एक उदाहरण आहे, ज्याने मार्शल आर्टला वेगळे स्थान दिले आणि लोकांना सांगितले की मार्शल आर्ट लोकांना काहीतरी देण्यावर विश्वास ठेवते, घेण्यावर नाही. या माध्यमातून कॉस्मोने लाखो लोकांना मदत केली आणि अनेकांना मोफत शिक्षण दिले. एक सक्षम माणूस बनवला आणि त्याच्या जीवनाचा एक उद्देश दिला.”

मास्टर कॉस्मो जिमिक म्हणतात, “या जगातिक समुदायातील इतरांना मदत करण्यासाठी आपण काहीतरी करू या. हा चित्रपट तुम्हाला चांगले कार्य करण्यास प्रेरित करेल आणि जग बदलण्यासाठी आपल्या जीवनावर परिणाम करेल, कारण आपण दोघेही प्रयत्न करत आहोत. मानवाने प्रयत्न करत राहावे, यश मिळो किंवा न मिळो.पण एक ना एक दिवस हा प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल.”