‘स्वराज्य महोत्सव ‘ अंतर्गत ‘सामुहीक राष्ट्रगीत गायन’ कार्यक्रम १६ हजार विद्यार्थ्याच्या उपस्थितीत विभागीय क्रीडा संकुल येथे संपन्न

29

✒️औरंगाबाद(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

औरंगाबाद(दि.9ऑगस्ट):- जिल्हा प्रशासन, औरंगाबाद आणि भारत सरकार माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय- औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संकलपनेतून साकार ‘स्वराज्य महोत्सव ‘ अंतर्गत ‘सामुहीक राष्ट्रगीत गायन’ कार्यक्रम १६ हजार विद्यार्थ्याच्या उपस्थितीत विभागीय क्रीडा संकुल येथे संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर खासदार इम्तियाज जलील, माजी विधानसभा अध्यक्ष व आमदार हरिभाऊ बागडे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगर पालिकेचे आयुक्त, अभिजित चौधरी, पोलिस अधिक्षक, मनोज कलवानिया, जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी, निलेश गटणे, स्वातंत्र्य सैनिक, नारायण श्रोफ, तंत्रशिक्षण सहसंचालक, उमेश नागदिवे, शिक्षण विभागाचे उपसंचालक, अनिल साबले, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक, सतीष देशपांडे, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, औरंगाबादचे प्रबंधक, संतोष देशमुख, शिक्षणाधिकारी, मधुकर देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी, चंद्रशेखर घुगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात प्रमुख उपस्थित मान्यवरांचे केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय- औरंगाबाद तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. हरिभाऊ बागडे यांनी स्वातंत्र्य लढ्यातील ऑगस्ट क्रांती दिन, भारत छोड़ो आंदोलना चे महत्त्व विषद केले व विद्यार्थ्यांना आर्मीत अग्निवीर म्हणून शामिल होण्याचे आवाहन केले. इम्तियाज जलील यांनी राष्ट्रीय एकताचे महत्त्व पटवून सांगितले तसेच सुनील चव्हाण यांनीही उपस्थितांना प्रत्येक घरी १३ ते १५ ऑगस्ट ला तिरंगा लाऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत सरकार माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्युरो, पंजीकृत शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संच, औरंगाबादचे सुरेश जाधव व त्यांच्या सहकार्यांनी देशभक्तीपर पोवाडा सादर केला.

यावेळी भक्तिमय वातावरण तयार झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी मिळून एकत्रित पणे राष्ट्रगित गायले. कार्यक्रमाचा नंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, हर घर तिरंगा जनजागृती चित्रप्रदर्शन वाहनाचे हिरवा झेंडा दाखवून सुनिल चव्हाण यांनी उद्घाटन केले. हे चित्रप्रर्शन आज पासून 7 दिवस संपूर्ण जिल्ह्यात फिरून ऑडियो च्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हर घर तिरंगा संबंधी जनजागृती करणार आहे.