डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे देशात राजकीय पक्ष स्वतः च्या तत्व प्रणालीला देशांपेक्षा मोठे मानत आहेत व प्रचंड बहुमत असेल तर देशात हुकूमशाही येणार?-एस के भंडारे

36

🔸नागपूर मोर्चात लाखोंच्या संखेने सहभागी होण्याचे आवाहन

✒️औरंगाबाद(पुरोगामी न्युज नेटवर्क)

औरंगाबाद(दि.5सप्टेंबर):-राज्यातील 80 संघटनांच्या आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने SC, ST, DT, NT, SBC,OBC समाज , विद्यार्थी, कामगार,कर्मचारी, अधिकारी यांच्या 32मागण्यांसाठी 3ऑक्टोंबर 2022रोजी नागपूर येथे महाअक्रोश विराट मोर्चा च्या तयारी,प्रचार प्रसार व जन जागृतीसाठीऔरंगाबाद येथे सुभेदारी सभागृह व शाक्य बुद्ध विहार येथे आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य समन्वयक व आयबीसेफ चे केंद्रिय सरचिटणीस एस के भंडारे यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी त्यांनी भारतीय स्वातंत्र्यावेळी संविधानाने दिलेले अधिकार व सोयी सुविधा काढुन घेऊन आपणास पूर्वीच्या चातुर्वण्यप्रमाणे समाज रचना करण्यासाठी 2024 मध्ये संविधानच बदलण्याचा प्रयत्न आरक्षणाचे ,समतेचे व संविधानाचे विरोधक काम करीत आहेत.

आपल्याला पुन्हा पेशवाईच्या वेळेप्रमाणे गळ्यात मडके व पाठीला खराटा घ्यायला लावायचा विरोधकांचा मनसुबा आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 25/11/1949 रोजी इशारा दिल्याप्रमाणे देशात राजकीय पक्ष स्वतः च्या तत्व प्रणालीला देशांपेक्षा मोठे मानले तर आपले स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि प्रचंड बहुमत असेल तर देशात हुकूमशाहीची शक्यता वास्तवात येण्याचा मोठा धोका आहे ,हा इशारा खरा ठरताना दिसत आहे त्यामुळे आरक्षणाचे लाभ घेतलेल्या सर्व लाभार्थीनी पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी 3ऑक्टोंबर च्या मोर्चास लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले .बैठकीचे आयोजन बाणाईचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष बी के आदमाने यांनी केले.

या बैठकीस भारतीय बौद्ध महासभा , कास्ट्रइब् राज्य परिवहन कर्मचारी संघटना ,म्हाडा मागासवर्गीय संघटना ,समता सैनिक दल ,चर्मकार विकास संघ ,धनगर अधिकारी कर्मचारी संघटना ,शिक्षक संघटना इत्यादी विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते .या बैठकीस राज्य परिवहन संघटनेचे भारत खंदारे ,भारतीय बौद्ध महासभेचे विभागीय सचिव के आर पडवळ ,औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष किशोर जोहरे ,जालना जिल्हा अध्यक्ष महेंद्र बनकर सरचिटणीस राजेश सदावर्ते धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे गणेश खबडे ,चर्मकार विकास संघाचे बावस्कर ,बाणाईचे एस एस भगत ,म्हाडाचे रमेश बरफे यांनी सहभाग घेतला व औरंगाबाद व जालना जिल्ह्यातून महा अक्रोश विराट मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा ठराव करण्यात आला.सूत्रसंचालन किशोर जोहरे यांनी केले .भारतीय बौध्द महासभेच्या बैठकीत आद.भीमराव आंबेडकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती मजबूत करण्याच्या अनुषंगाने 2024 मध्ये 10 करोड लोकांचे धर्मांतर करण्याच्या संकल्प केला असून तो पूर्ण करण्यासाठी ठीक ठिकाणी बहुजन समाजाच्या संघटना च्या सोबत बैठका घेण्याचे आवाहन एस के भंडारे यांनी केले .