नायगाव शहरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मोठ्या उत्साहाने अभिवादन सोहळा साजरा

100

✒️हायमंत चंदनकर(नायगाव प्रतिनिधी)

नायगाव(दि.18सप्टेंबर):- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त नायगाव शहरांमध्ये स्वतंत्र वीर कर्मयोगी संन्याशी स्वामी रामानंद तीर्थ चौक येथे नाम फलकाला पुष्पहार अर्पण करून यासह सर्व वीरांना अभिवादन करत या कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठलराव पाटील शिंदे तसेच प्रमुख पाहुणे बालाजी कदम सर सुजगावकर प्रमुख उपस्थिती होते

आयोजित केलेल्या कार्यक्रमाला भाऊराव पाटील चव्हाण पांडुरंग पाटील कल्याण यांच्या उपस्थित तर नायगाव विधानसभा मतदारसंघाचे उगवत नेतृत्व गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आले तसेच या म्हणी प्रमाणे “या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू “जोवर वाहे गोदामाई तोवर गाणे गाऊ निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी शूर विराने बलिदान दिले आहे

रणसंग्रामातील धगधगत्या रणवेदीवर आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या असंख्य ज्ञात, अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या ज्वाज्वल्य स्मृतीस विनम्र अभिवादन या कार्यक्रमास उपस्थित गजानन पा.तमलुरे (शिवसेना शहर प्रमुख),चंद्रकांत चौधरी, मारुती कतुरवार, दिलीप परतवाड, दिगंबर खांडरे, संजय पप्पू सुर्यवंशी, बालाजी अलगुलवार भास्कर परतवाड, परमेश्वर सुकने,श्रीनिवास चव्हाण असंख्य बांधवच्या उपस्थिता सह मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी अभिवादन करण्यात आले आहे.