महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती वरोरा च्या कार्यकारिणीचा विस्तार

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.18सप्टेंबर):- वरोरा शाखेच्या कार्यकारिणीचा विस्तार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरोरा येथे पुरोगामी शिलेदारांच्या उपस्थितीत करण्यात आला . अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती वरोराच्या नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली.

नवीन कार्यकारिणीत वरोरा तालुक्यातून जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जयदेव आसेकर यांची निवड करण्यात आली.तालुका उपाध्यक्ष म्हणून केशव मिलमिले, विजय नन्नावरे, भास्कर गाडगे तर कार्यालयीन सचिव प्रदीप ढोके , सहसचिव अमृत गेडाम ,संपर्क प्रमुख वसंता राखुंदे , सहकार्याध्यक्ष प्रमोद तुराणकार , सहकोषाध्यक्ष हिरालाल कुरेकार , प्रमुख संघटक रवींद्र गावंडे ,कार्यालयीन उपसचिव राजेंद्र मेंढूले , प्रसिद्धी प्रमुख राहुल ढाकणे सल्लागार किशोर पंधरे यांची एकमताने निवड करण्यात आली .

तसेच आंतरजिल्हा बदलीने वरोरा तालुक्यात रुजू झालेल्या शिक्षकांचे स्वागत करण्यात आले . याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्री. रामचंद्र नागपूरे सर, तालुका नेते श्री. रामभाऊ दुमोरे सर, सरचिटणीस श्री. संदिप चौधरी, कार्याध्यक्ष श्री. उमेश आखाडे सर, कोषाध्यक्ष श्री. गजानन पाचभाई सर, श्री. मेंढूले सर, श्री. शिवणकर सर, श्री.रोहाड सर, पुरोगामी महिला मंच च्या सरचिटणीस कु स्वाती खराबे मॅडम, आमचे मार्गदर्शक श्री. पंडित लोंढे सर श्री. नगाजी साळवे सर व श्री राजेश गायकवाड सर इत्यादी पुरोगामी शिलेदार उपस्थित होते.