बहुजन समाज हाच माझा नेता आणि बहुजन समाज हाच माझा पक्ष- दत्ता वाकसे

32

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.19सप्टेंबर):-गेल्या पंधरा वर्षापासून बहुजन चळवळीला वाहून दिला असून बहुजन समाजाचे छोटे मोठे प्रश्न सोडवण्यासाठी मी सतत कार्यरत असतो बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी विकासासाठी रात्री अपरात्री त्याचबरोबर सर्वसामान्य माणसाच्या कामासाठी अहोरात्र रस्त्यावर असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कायम आगामी काळातही आहे त्यामुळे बहुजन समाज हाच माझा नेता आणि बहुजन समाज हाच माझा पक्ष आहे असे मत शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संघटनेचे व्हाईस प्रेसिडेंट दत्ता दत्ता वाकसे यांनी म्हटले आहे.

पुढे ते दिलेल्या प्रसिद्धीत पत्रकात म्हणाले की आत्तापर्यंत मी कोणत्याही पक्षांमध्ये प्रवेश केलेला नाही करणार नाही त्यामुळे माझ्या नावाबाबत कोणीही संभ्रम निर्माण करू नये विविध वृत्तपत्रांनी बातम्या प्रकाशित केले आहेत जाहिराती प्रकाशित केले आहेत की मी युवा सेना तालुकाप्रमुख पदावर निवड झाली आहे परंतु हे अतिशय चुकीचे असून मी कोणत्याही पक्षामध्ये गेलेला नसून मी अहोरात्र काम हे बहुजन समाजासाठी ओबीसी समाजासाठी गरीब मराठा समाजासाठी सतत करत राहणार आहे त्यांचे छोटे-मोठे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढणार आहे आगामी काळात जेव्हा जेव्हा बहुजन समाजावर मराठा समाजावर अन्याय अत्याचार होईल तेव्हा तेव्हा मी संपूर्ण ताकतीने त्या समाजासोबत आहे बहुजनांसोबत आहे त्यामुळे कोणत्याही पक्षाने माझं नाव वापरू नये आगामी काळात बहुजन समाजाच्या विचाराशी मी निगडित असून त्यांचे प्रश्न सोडवणे आज माझा उद्देश आहे.

त्यांचे प्रश्न सोडवणे हाच माझा ध्यास आहे त्यामुळे बहुजन समाजावर जेव्हा रस्त्यावरची लढाई लढण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा मी संपूर्ण ताकतीने बहुजन समाजाच्या प्रश्नासाठी रस्त्यावर आहे त्यामुळे मी कधीही कोणत्याही पक्षामध्ये गेलेलो नसून माझ्या नावाचा वापर कोणीही करू नये केला तर मी आगामी काळात त्या विषयावर वेगळ्या पद्धतीने जावा लागेल त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करून माझे नाव वापरण्याचा प्रयत्न करू नये असे देखील दिलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये शेफर्स इंडिया इंटरनॅशनल संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे