धरणगाव शहरातील पारोळा नाका परिसरातून मोटार सायकल चोरीस

30

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.19सप्टेंबर):-शहरातील पारोळा नाका परिसरातील बडगुजर ऑटो गॅरेज जवळून मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. धरणगाव शहरातील पद्मालय नगर येथील रहिवाशी अजय प्रकाश गुरव, वय – ४० यांच्या मालकीची बजाज कंपनीची प्लॅटीना मोटार सायकल क्र. ( MH.19 BP – 4850 ) ही दि. १६ सप्टे, २२ शुक्रवार रोजी रात्री ११-३० वाजेच्या सुमारास पारोळा नाकाजवळील गॅरेज जवळ लावलेली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची मोटार सायकल चोरून नेली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसापासून धरणगाव शहर व परिसरातून मोटार सायकल चोरीला जाण्याचे, व घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसापुर्वी पोलिसांनी एका मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद केले होते. तरी देखील मोटार सायकल चोरी सुरु असल्यामुळे वाहनधारक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सदर चोरीस गेलेली मोटासायकल ची माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिले जाण्याचे आवाहन मोटरसायकल मालकाने केले आहे.