देहव्यापार करवणाऱ्या दाम्पत्याचा ब्रम्हपुरी येथे भांडा फोड-स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांची मोठी कारवाही

40

🔹कलकत्ता येथून देहव्यापारासठी अपहरण केलेल्या एका 14 वर्षीय मुलीची पोलिसांनी ब्रह्मपुरी शहरातून केली सुटका

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.20सप्टेंबर):-ब्रह्मपुरी शहरात काही ठिकाणी बाहेरून मुली आणून त्यांच्याकडून देह व्यापार करवून घेतला जात आहे. कलकत्ता येथून देहव्यापारासठी अपहरण केलेल्या एका मुलीची पोलिसांनी ब्रह्मपुरी शहरातून सुटका केली. कलकत्ता येथील एक अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. ही मुलगी ब्रह्मपुरी शहरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना प्राप्त झाली होती. दरम्यान, पोलिसांनी शनिवारी ब्रह्मपुरी गाठून अपहृत मुलीला ताब्यात घेत तिची सुटका केली. याप्रकरणात मालडोंगरीमार्गावरील विदर्भ इस्टेटमध्ये वास्तव्यास असलेले लोणारे दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, कलकत्ता येथील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नागपूरला आणले.

तेथून त्या मुलीला चंद्रपूरला नेण्यात आले. चंद्रपूरवरून अल्पवयीन मुलीला परत नागपूरला आणल. नागपूरवरून लोणारे दाम्पत्यानी तिला ब्रह्मपुरीला आणले. लोणारे दाम्पत्य शहरात किरायाने घर घेऊन तिथे बाहेरून मुली आणून देह विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती गोपनीय सूत्राने दिली होती. विशेष म्हणजे ते वारंवार घर बदलवित होते. कलकत्ता येथून अपहरण करून आणलेली मुलगी ब्रह्मपुरीला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी पोलिसांनी सापळा रचून अल्पवयीन मुलीची लोणारे दाम्पत्याच्या तावडीतून सुटका केली.

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व ब्रह्मपुरी पोलिसांच्या सायुक्त कार्यवाहीनंतर या कार्यवाहीत सोबत असलेल्या व अल्पवयीन मुलींना देहव्यापारपासून मुक्त करण्याचे काम करणाऱ्या नागपूर येथील एका सामाजिक संस्थेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल. मंजित रामचंद्र लोणारे (40), चंदा मंजित लोणारे (32) या पती, पत्नीवर पोलिसांनी मानव तस्करी अधीनियम, पोस्को, पिटा ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.