शेतकऱ्यांना त्वरित पीक नुकसान भरपाई द्यावी नुकसान भरपाईचे पंचनामे सरसकट करा व लम्पिआजार वर लसीकरण करण्यात यावी – गुलाबरावजी वाघ

  61

  ✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

  धरणगाव(दि.22सप्टेंबर):- तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आपादग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ यांनी नायब तहसिलदार यांना आज रोजी एका निवेदनाव्दारे केली आहे.

  निवेदनात नमूद केले आहे की,धरणगाव तालुक्यातील व परिसरात संततधार व मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. कपाशीचे पीक जमीनदोस्त झाले असून इतर पिकांचेही बरेच नुकसान झाले आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे झाडेही उन्मळून पडली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गीक आपत्तीमुळे हिरावल्या गेला आहे. कपाशीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे खर्चाएवढे उत्पादन निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी डबघाईस आला आहे.त्यामुळे त्यांना तातडीने पीक नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. अतिवृष्टीच्या निकषानुसार नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरतात.

  याकरिता पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.तसेच शेतकऱ्यांचा गुरांवर लम्पि आजार ने त्रस्त आहे त्यावर उपाययोजना म्हणून लसीकरण व फवारणी लवकरात लवकर करण्याचे निवेदन देताना शिवसेना सहसपर्क गुलाबरावजी वाघ व शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भाऊ भागळे यांनी केले.

  यावेळीं उपस्थित मा लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी , नगरसेवक वासुदेव चौधरी भागवत चौधरी सुरेश महाजन जितू धनगर अँड शरद माळी उपतालुक प्रमुख राजेंद्र ठाकरे मा जि प सदस्य जानकीराम पाटील दीपक सोनवणे नाना ठाकरे देशमुख धिरेंद्र पुरभे हेमंत महाजन सुनिल चव्हाण भरत महाजन कृपाराम महाजन बापू महाजन सुनील चव्हाण परमेश्वर महाजन राहुल रोकडे रवी जाधव कमलेश बोरसे गजानन महाजन बापू महाजन नंदू पाटील आनंद धनगर भीमराव धनगर गोपाल चौधरी सुखदेव चौधरी पप्पू सोनार पंकज महाले जयेश महाजन विलास पवार आधी शिवसैनिक पदाधिकारी सह शेतकरी उपस्थित होते.