नाशिक शिवसेनेत सत्तासंघर्ष चालू असताना, महापालिकेतील कर्मचारी सेना अध्यक्षपदाचा संघर्ष पेटला

67

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.1ऑक्टोबर):-नाशिकशहर शिवसेनेत सत्तासंघर्ष पेटलेला असताना नाशिक महापालिकेतील कर्मचारी कामगार संघटनेच्या नेतृत्वावरून सुधाकर बडगुजर व प्रवीण तिदमे यांच्यात वाद निर्माण झाला आहे. नवनियुक्त अध्यक्ष बडगुजर यांनी पक्षाच्या कार्यालयातच संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेत तिदमे यांना आव्हान दिले आहे. शिंदे व ठाकरे गटाप्रमाणेच दोघांमधील वाद आता थेट न्यायालयापर्यंत जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

प्रवीण तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश करताच संघटनेचे संस्थापक बचन घोलप यांनी त्यांची अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करत त्याजागी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती केली. त्याच अनुषंगाने मंगळवारी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात सर्वसाधारण सभा घेत ठरावाद्वारे बडगुजर यांची निवड करण्यात आली. या नियुक्तीसाठी नाशिक महापालिका कामगार प्रश्न कडे तिदमे यांनी कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे कर्मचारी तक्रारी करत होते. त्याआधारे अध्यक्षपदी बडगुजरांची निवड केली. तिदमेना हवे तर न्यायालयात जावे.

असे आवाहन माजी ‌समाजकल्याणमञी महापालिका कर्मचारी कामगार सेना संस्थापक अध्यक्ष बबन नाना घोलप यांनी दिले.
मुख्यालयात सर्वसाधारण सभेच आयोजन केले होते. त्याचवेळी विद्यमान अध्यक्ष, शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे हेही आपल्या समर्थकांसोबत महापालिका मुख्यालयात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यातून संघर्ष उभा राहू शकत असल्याने पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त पालिका मुख्यालयात तैनात केला. मुख्यालयात येणारे प्रत्येक वाहन तपासून आत सोडल जात होते. मात्र पोलीस आयुक्तांनी पालिका मुख्यालयात सर्वसाधारण सभा घ्यायलाच परवानगी नाकारली. त्यानंतर ही सभा शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यलयात पार पडली. तिदमे यांनीही अध्यक्षपद सोडण्यास नकार दिल्याने वाद न्यायालयात जाऊ शकतो.