एन.पी. कंट्रक्शनचे बिले थांबवण्याचे लेखी पत्र घेतल्यानंतर ‘जनशक्ती’चे बांगडी आंदोलन मागे

29

🔹’जनशक्ती’ च्या आंदोलनासमोर बांधकाम विभागाचे अधिकारी झुकले, १४ सप्टेंबर रोजी बैठक

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.1ऑक्टोबर):-पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा ला जोडणारा प्रमुख रस्त्याचं काम निकृष्ट पद्धतीचं झाल्या प्रकरणी जनशक्ती संघटनेने 18 फेब्रुवारी 2022 रोजी आंदोलन केले. या आंदोलनावेळी ठेकेदाराला दंड करू असे पत्र दिले. मात्र ८ महिन्यानंतर देखील ठेकेदाराला कोणताच दंड न केल्याने आणि जनशक्ती संघटनेची फसवणूक केल्याने जनशक्ती संघटनेने आज सार्वजनिक बांधकाम विभाग, अकलूज येथे येथे बांगडी आंदोलन केले. आंदोलनानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत १४ ऑक्टोबर रोजी बैठक लावण्याचे आश्वासन देत बैठकीत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत एन.पी. कंस्ट्रक्शन ची सर्व देयके थकविली जातील असे लेखी पत्र दिल्याने आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले.

आज दि.३० रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, अकलुज येथे जनशक्ती संघटनेचे आंदोलन जनशक्ती अध्यक्ष अतूल खूपसे-पाटील यांच्या आणि जनशक्ती संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा विनिता बर्फे यांच्या नेतृत्वाखाली बांगडी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला ठाम भूमिका घेतल्यामुळे यश आले आहे.

दरम्यान जनशक्ती संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही व्हावी किंवा एन. पी. कंपनीचा दंड सार्वजनिक बांधकाम विभागाने वसूल करावा नाही. तर त्याचे निघणारे उर्वरित बिल थांबवावे अशी मागणी अतुल खूपसे यांची होती. परंतु अधिकारी मान्य करत नसल्याने अधिकाऱ्यांशी शाब्दिक चकमक झाली. कार्यवाही करण्यासाठी कोणत्या नियमाखाली त्यांना सदर कंपनीवर दंड आकरता येतो आणि अधिकाऱ्यावर नियमावर बोट ठेवत दबाव टाकला आणि सदर आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता तेलंग यांनी एन. पी. कन्स्ट्रक्शन या कंपनीला मिळणारे उर्वरित 70 कोटी रुपये बिल थांबवत असल्याचे लेखी पत्र दिले आणि त्यानंतर जनशक्ती संघटनेच्या वतीने आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अरुण भोसले, गणेश वायभासे, उपजिल्हा प्रमुख अतुल राऊत, शरद एकाड, दिपाली डिरे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष वंदना पंत, ज्योती भुजंगे, गणेश ढोबळे, बापू मोहिते, हनुमंत कांतोडे, साहेबराव इटकर, रामराजे डोलारे, किरण भांगे, केशव लोखंडे, दत्ता गोरे, अनिल भोसले, रवी गंभीरे, किशोर शिंदे, अक्षय देवडकर, विठल कानगुडे, सुदाम आवारे ,सतीश साठे, शिवराम गायकवाड, रफिक सय्यद, महिला कार्यकर्ते आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते